हे वर्ष पुन्हा न येणे… खर आहे…संपूर्ण देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. देशभरात विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहेत. सगळ्यांचा उद्देश एकच की अहिंसा आणि क्रांतिकारी मार्गांचा अवलंब करून भारत देशाला गुलामगिरीच्या पाशातून बाहेर काढले. प्रसंगी शेकडो देशभक्तांना बलिदान द्यावे लागले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन देण्यासाठी नागपूरच्या झीरो miles येथे रामटेकचे क्रांती दुत ९ ऑगस्ट रोजी सकाळी एकत्रित येतील.
स्व. जतिरामजी बर्वे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलित केली जाईल. ही क्रांती ज्योत एक क्रांती दुत धावत जाऊन एक की.मी. अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या क्रांती दुताला हस्तांतरित करेल.दुसरा तिसऱ्याला करेल. असे करत करत ५० ते ६० क्रांती दुत द्वारा क्रांती ज्योत गांधी चौक रामटेक येथे आणली जाईल.
या संपूर्ण प्रवासात नागपूर, कामठी,कन्हान, मनसर,रामटेक परिसरातील जनतेला ट्रॅफिक नियमाचे पालन,निरोगी जीवन, एकमेकांप्रती आदर, भारताची एकता व अखंडता अधिक मजबूत करून राष्ट्राला सशक्त व विकसित करण्याचे आवाहन करण्यात येईल. करिता या पुण्यमई आनंदाचा क्षण अनुभवन्याकरिता जनतेने यात भाग घेऊन क्रांती दुत बनावे असे आवाहन सृष्टी सौंदर्य परिवार तर्फे करण्यात आले आहे.
उपक्रम ९ ऑगस्ट ला झीरो miles नागपूर येथे सकाळी सहा वाजता सुरू होऊन अंदाजे सहा तास प्रवास करत दुपारी १२ ते १ च्या दरम्यान गांधी चौक रामटेक येथे पूर्ण होईल.