Sunday, December 22, 2024
Homeराज्यअहेरी येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न...

अहेरी येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न…

दानशूरचा राजा गणेश मंडळ तथा राजे फाउंडेशन,अहेरी यांचा पुढाकाराने रुग्णांना होणार मोठी सोय.

अहेरी राजनगरीतील गणेशोत्सव मोठ्या श्रध्देने आणि सामाजिक कार्याची प्रेरणा देणारे वारसा लाभलेला आहे. यंदाही नेहमी प्रमाणे दानशूर गणेश मंडळ तथा राजे फाऊंडेशन, अहेरी अभिनव सामाजिक कार्य करीत आहे.

अहेरी इस्टेटचे राजमाता रुक्मिणी देवी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन दानशूर गणेश मंडळ तथा राजे फाउंडेशन, अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी उपविभागातील गरजू रुग्णांचा रुग्णसेवेकरीता नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण काल माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले..!!

ह्यावेळी विश्वनाथराव बाबा आत्राम, अवधेशबाबा आत्राम, प्रविनराव बाबा आत्राम, ज्येष्ठ नेते प्रकाश गुड्डेल्लीवार, सामाजिक कार्यकर्ते रवी नेलकुद्री, विनोद जिल्लेवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, सामाजिक कार्यकर्त्या पूर्वा दोंतुलवार, श्रीनिवास भंडारी, साई रामगिरवार सह दानशूर गणेश मंडळाचे सदस्य तसेच गावातील महिला व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आणि मुलचेरा या पाच तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम गावातील रुग्ण दररोज उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे गंभीर आजाराने दाखल होतात. पण अनेक वेळा गंभीर आजाराने रुग्णांना रेफर करण्यात येते परंतु रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्याने वेळेच्या अभावाने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. हे बाब दानशूर गणेश मंडळाने राजे फाउंडेशनचे प्रमुख राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात आणून दिले.

विषयाचे गांभीर्य ओळखून राजे साहेबांनी लगेच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. आणि दानशूरचा राजा गणेश मंडळ आणि राजे फाउंडेशन,अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी भागातील रुग्णाच्या सेवेकरीता रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठी सोय झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: