Sunday, December 22, 2024
HomeSocial Trendingभाजपच्या मोठ्या महिला पदाधिकाऱ्यासोबत कार्यकर्त्याचा चावटपणा...Viral Video...

भाजपच्या मोठ्या महिला पदाधिकाऱ्यासोबत कार्यकर्त्याचा चावटपणा…Viral Video…

भाजप पार्टी हि सज्जनाची पार्टी म्हणून ओळख आहे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या पार्टीत अनेक महिला नेत्या तसेच कार्यकर्त्या प्रामाणिकपणे काम करतांना दिसतात, मात्र पार्टीत या महिला किती सुरुक्षित आहेत हा मोठा प्रश्न येथे पडला आहे. कारण सध्या सोशल मिडीयावर एक तामिळनाडू येथील व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एका महिला नेत्याला पब्लीकली लैंगिक छळाचा सामना करावा लागत असल्याचा हा व्हिडीओ आहे.

सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत या व्हिडिओतील महिला म्हणजे शशिकला पुष्पा. ह्या भाजपच्या तामिळनाडूच्या उपाध्यक्षा आहेत. त्या माजी खासदार आहेत आणि महिला आणि बाल विकासाच्या सदस्य होत्या. एका कार्यक्रमानिमित्य जमलेल्या ठिकाणी एक व्यक्ती गर्दीतून त्या महिला पदाधिकारी यांच्या जवळ येतो आणि गर्दीचा फायदा उचलत आपला हात महिलेच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न करतो मात्र ती महिला त्याचा मनसुबा ओळखते आणि त्याचा हात बाजूला करते.

या अशोभनीय कृत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत अनेक जण यावर आपले मत मांडीत आहे. राज्याचे उपाध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार अशा लैंगिक छळाचा सामना करतात. सामान्य बूथ कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचे काय होत असेल याची कल्पना करा. या प्रकरणावर भाजपा कडून अद्यापही कोणाचे स्पष्टीकरण आले नसून मात्र हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सौजन्य – Twitter
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: