न्युज डेस्क – गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF), जे अमूल आणि मदर डेअरी ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करतात, त्यांनी सोमवारपासून देशभरात दुधाच्या दरात सुमारे 2 रुपयांनी वाढ केली आहे. जीसीएमएमएफने काल रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2 रुपये प्रति लिटरच्या वाढीमुळे कमाल किरकोळ किमतीत तीन ते चार टक्क्यांनी वाढ होईल, जी अन्नधान्याच्या सरासरी चलनवाढीच्या तुलनेत खूपच कमी आहे. लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही दरवाढ जाहीर करण्यात आली आहे.
अमूल आणि मदर डेअरीच्या दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर दिल्लीतील ग्राहकांना आता एक लिटर अमूल गोल्ड 66 रुपयांऐवजी 68 रुपयांना मिळणार आहे. अर्धा लिटर अमूल गोल्ड 34 रुपये मोजावे लागेल. अमूल ताजा अर्धा लिटरची किंमत 26 रुपयांवरून 27 रुपये करण्यात आली आहे. तर एक लिटरचा दर 54 रुपयांवरून 56 रुपयांपर्यंत वाढला आहे. अमूल गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर 56 रुपये मोजावे लागतील. अमूल स्लिम आणि ट्रिम 49 रुपये प्रति लिटर झाला आहे.
Mother Dairy has increased prices of fresh pouch milk (All variants) by Rs 2 per litre, effective from June 3: Mother Dairy pic.twitter.com/zUnftxsG7d
— ANI (@ANI) June 3, 2024
Amul has increased prices of fresh pouch milk (All variants) by Rs 2 per litre, effective from June 3: Gujarat Cooperative Milk Marketing Federation Limited pic.twitter.com/lWsgtv44hx
— ANI (@ANI) June 2, 2024
फेब्रुवारी 2023 पासून दुधाच्या दरात वाढ केलेली नाही, असे GCMMF ने म्हटले आहे.GCMMF ने म्हटले आहे, “किमतीतील ही वाढ दुधाच्या उत्पादन आणि ऑपरेशनच्या एकूण खर्चात वाढ झाल्यामुळे झाली आहे…” अमूल आणि मदर डेअरी ही देशातील आघाडीची दूध पुरवठादार आहे.