Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यमाझी माती माझा देश उपक्रमा अंतर्गत "अमृत कलश" माती भरणा कार्यक्रम...

माझी माती माझा देश उपक्रमा अंतर्गत “अमृत कलश” माती भरणा कार्यक्रम…

मूर्तिजापूर – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमा अंतर्गत माझी माती माझा देश अंतर्गत आज दिनांक २५ शुक्रवार रोजी अमृत कलश माती भरणा कार्यक्रम दुपारी ठीक १ वाजता नगर परिषद कार्यालय मूर्तिजापूर येथे आयोजीत करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाला सुप्रिया टवलारे प्रशासक तथा मुख्याधिकारी, मोनालीताई गावंडे माजी नगराध्यक्षा, रितेश सबाजकर भाजपा शहर अध्यक्ष, राहुल गुल्हाने यांची प्रमुख उपस्थिती होती, यांचे हस्ते अमृत कलशाचे पूजन करून कलशामध्ये सर्वांचे हस्ते माती भरण्यात आली.

नगर परिषद हद्दीतील एक दोन मूठ माती घेऊन त्यातून शहराचा कलश तयार करून तो जिल्हास्तरावर जमा करून जमा झालेल्या सर्व कलशामधून थोडी माती घेऊन प्रत्येक जिल्ह्याचा एक कलश तयार करून पुढे तो कलश मा. पंतप्रधान महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे पाठविण्यात येत आहे.

त्याकरिता आज मूर्तिजापूर नगर परिषद येथे हा मातीचा अमृत कलश तयार करून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आला. कार्यक्रमाला राजेश भूगुल सहा प्रकल्प अधिकारी, निशीकांत परळीकर कार्यालय अधिक्षक , पुरुषोत्तम पोटे नगर अभियंता, ,

अनिकेत मंगरुळकर लेखापाल, प्रसाद सुर्यवंशी , भाग्यश्री लांडगे विद्युत अभियंता, शुभम बचुटे कर अधिक्षक, नरेंद्र फुरसुले , शिरीष गांधी, केतन चिंचमलातपुरे शहर समन्वयक, विजय लकडे, नरसिंग चावरे आरोग्य निरीक्षक, नितिन शिंगणे, अमोल तायडे, विलास ठाकरे, व सर्व कर्मचारीवृंद यांची उपस्थिती होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: