Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनअमृताची नखरेल अदा...‘सुर्या’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार...

अमृताची नखरेल अदा…‘सुर्या’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार…

अभिनेत्री अमृता पत्की हिने ग्लॅमर विश्वात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. २००६च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेपर्यंत यशस्वी ठरल्यानंतर अमृताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘मिस अर्थ’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तिथेही ‘मिस अर्थ एअर’चा किताब मिळवला होता. अमृताने २०१०मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर काही मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली होती. मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली ही गुणी अभिनेत्री आता बऱ्याच कालावधीनंतर ‘सुर्या’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

सध्या मराठी चित्रपटात बॉलीवूड तारका आयटम साँगवर थिरकताना दिसतायेत. या यादीत अमृताचाही समावेश झाला आहे. अमृता पत्की हिच्या नृत्याचा जलवा ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे.

‘रापचिक रापचिक कोळीणबाई’ असे बोल असणाऱ्या या गाण्यात अमृताचा नखरेल अंदाज पहायला मिळणार आहे. नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. संतोष दरेकर, मंगेश ठाणगे, देव चौहान यांनी लिहिलेल्या गाण्याला देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. ममता शर्मा आणि देव चौहान यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणं गायलं आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सच्या ‘सुर्या’ हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट ६ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. हसनैन हैद्राबादवाला यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

‘हे आयटम सॉंग करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेल’ असा विश्वास अमृताने व्यक्त केला.

‘सुर्या’ चित्रपटाची कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. साहसदृश्ये अब्बास अली मोघल आणि मोझेस फर्नांडिस यांची आहेत. रेश्मा मंगेश ठाणगे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, प्रसाद मंगेश, चेतन मंगेश हे या चित्रटाचे सहनिर्माते आहेत. संग्राम शिर्के या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

‘सुर्या’निर्मिती – एस.पी मोशन पिक्चर्स, डीके प्रस्तुती – राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल, एस.पी मोशन पिक्चर्स, निर्माते – रेशमा मंगेश ठाणगेसहनिर्माते – प्रसाद मंगेश, चेतन मंगेशकार्यकारी निर्माते- संग्राम शिर्केदिग्दर्शक- हसनैन हैद्राबादवालाकथा – मंगेश ठाणगेपटकथा – विजय कदम, मंगेश ठाणगेसंवाद- विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकरअॅक्शन डिरेक्टर- अब्बास अली मोगल आणि मोझेस फर्नांडिससंकलन – राहुल भातणकरछायांकन – मधु.एस.रावनृत्यदिग्दर्शन – गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीवगीत – बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संजय मिश्रा, देव चौहानगायक – सुखविंदर सिंग, आदर्श शिंदे, नेहा राजपाल, राजा हसन, ममता शर्मा, कविता राम, खुशबू जैनसंगीत – देव चौहानकलाकारप्रसाद मंगेश – सुर्यारुचिता जाधव – काजलदेवशी खांडुरी – रियाहेमंत बिर्जे – रजाकहॅरी जोश- मुन्ना रेड्डीअखिलेंद्र मिश्रा- नारू रेड्डीगणेश यादव- उदयसिंह मोरेउदय टिकेकर – तात्या पाटीलपंकज विष्णु – मुख्यमंत्री आबासाहेब देशमुखअरुण नलावडे – हवालदार नाना पाटीलसंजीवनी जाधव – नाना पाटील त्यांची बायको वत्सलाराघवेंद्र कडकोळ – घोरपडे दीपज्योती नाईक- मिसेस कासीम शेखप्रदीप पटवर्धन- कासीम शेख दिलीप साडविलकर – चाळके जसबीर थंडी – चपंकशेठ पटेलगौरी देशमुख – आर्या पाटीलसंदेश जाधव – एसीपी भोसलेप्रताप बोऱ्हाडे-

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: