Friday, September 20, 2024
HomeSocial Trending'खतरों के खिलाडी' बनल्या अमृता फडणवीस…दोन्ही हातावर साप आणि सरड्यासोबत पोज देत...

‘खतरों के खिलाडी’ बनल्या अमृता फडणवीस…दोन्ही हातावर साप आणि सरड्यासोबत पोज देत म्हणाल्या…

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व तसेच गायिका, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या अमृता फडणवीस ह्या नेहमीच चर्चेत असतात त्यांची ऑनलाइन फॅन फॉलोअर्स प्रचंड आहेत. व्यावसायिक अपडेट्सपासून ते आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित विविध पोस्टसह त्या फॉलोअर्सना नेहमीच अपडेट ठेवतात. मात्र आज त्यांनी ट्वीटर वर दोन फोटो शेयर करून खळबळ उडवून दिली आहे.

साप म्हटल कि अनेकांनी त्याची भीती वाटते, टीव्ही शो ‘खतरों के खिलाडी’ मध्ये जसे कलाकार धोकादायक काम करतात तसेच काम अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्यांनी सापाचे दोन फोटो शेअर केले, पहिले दोन सापांचे आणि दुसऱ्या चित्रात सरड्याचे फोटो ट्वीट करीत लिहले…’सर्वात धोकादायक, विषारी आणि भयानक प्राणी फक्त मानव आहेत!’…यावर त्यांना वेगवेगळ्या तर काही मजेदार प्रतिक्रिया येत आहेत…

आता ही पोस्ट हळूहळू सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि त्यांच्या फॉलोअर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत. या चित्राला राजकारणाशी जोडताना एका वापरकर्त्याने टिप्पणी केली की, “महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीत हेच दिसत आहे.”

या वर्षी मार्चमध्ये मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अमृता फडणवीस खंडणी प्रकरणी तीन जणांविरुद्ध ७०० हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले तेव्हा अमृता फडणवीस यांचे नाव चर्चेत आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे त्यात अनिल जयसिंघानी, त्यांची मुलगी अनिक्षा आणि चुलत भाऊ निर्मल यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी अमृता फडणवीस खंडणी प्रकरणातील तिन्ही आरोपींचा उल्लेख असलेले ७३३ पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

सौजन्य – Amrita Fadnavis

अमृता फडणवीस यांना लाच आणि ब्लॅकमेल करणाऱ्या तीन आरोपींना मलबार हिल पोलिसांनी अटक केली. तिन्ही आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 385 आणि 120 (b) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 8 आणि 12 अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: