शेकडोंच्या घरात भजन मंडळ तथा शाहीर मंडळींची हजेरी…
रामटेक – राजु कापसे
सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार न्यू दिल्ली अंतर्गत जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक यांच्या सहयोगाने रामटेक येथे वि.शा.क.प.चे संस्थापक अध्यक्ष शाहीर गुलालरावजी टेंभुर्णे व धर्मदासजी भिवगडे यांची संयुक्त पुण्यतिथी व ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त लोककला उत्सवाचे भव्य दिव्य आयोजन आज दिनांक ११ सप्टेंबर ला देशमुख सेलिब्रेशन हॉल येथे करण्यात आले होते. उत्सवामध्ये संपूर्ण विदर्भातील कलावंत मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.
आकडेवारीमध्ये सांगायचे झाल्यास शेकडोच्या घरात भजन मंडळी तथा शाहीर मंडळी यावेळी उपस्थित होते. खडीगंमत ,दंडार, भारुड, भजन व कीर्तन इत्यादी कलेचे सादरीकरण यावेळी कार्यक्रमादरम्यान कलावंतांकडुन करण्यात आले होते.
याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन माजी मंत्री सुनील केदार, आमदार आशिष जयस्वाल, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, जि.प. अध्यक्ष बर्वे, जि.प. सदस्या शांता कुमरे, सचिन किरपान, रामसिंग सहारे, पं.स.सभापती कला ठाकरे आदी. उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमाला सकाळी ११ वाजतापासुनच सुरुवात करण्यात आली होती. विदर्भातुन दुरदुरुन शाहीर तथा भजन मंडळी यावेळी सदर कार्यक्रमाला उपस्थित झालेली होती.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनापासुन झाली. यानंतर उपस्थीत मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाहीर अलंकार टेंभूर्णे यांनी गित गात शाहीरकी पद्धतीने मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे भाषणे झालीत. कार्यक्रमादरम्यान बालकलाकार स्पर्श आनंद टेंभूर्णे याचा माजी मंत्री सुनील केदार, आमदार आशिष जयस्वाल, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे तथा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे यांचे यावेळी मोलाचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. संपुर्ण कार्यक्रमाचे संचालन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शाहीर अलंकार टेंभुर्णे यांनी केलेले होते. यावेळी उपस्थितांमध्ये नितीन भैसारे, पि.टी. रघुवंशी, बब्लु दुधबर्वे यांचेसह शेकडो शाहीर तथा भजन मंडळी उपस्थीत होते.