Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | पत्नीने व तिच्या प्रियकराने मिळून केला नवऱ्याचा गेम...वरूड पोलिसांनी २४...

अमरावती | पत्नीने व तिच्या प्रियकराने मिळून केला नवऱ्याचा गेम…वरूड पोलिसांनी २४ तासात केला हत्येचा उलगडा…

अमरावती ग्रामिण जिल्हयातील पोलीस स्टेशन वरूड हद्दीत दि. १४/०५/२०२३ रोजी ग्राम एकलविहीर येथे राजेन्द्र ढोके यांच्या विहीरीत अनोळखी इसमाचे हाडे पोत्यात भरुन टाकलेली मिळुन आल्याने पो.स्टे. वरुड येथे अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द अप क्र. ३९७ / २३ कलम ३०२,२०१ भा. द. वी. प्रमाणे नोंद करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य पाहता. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी घटनास्थळाला भेट देवुन गुन्हयात मृतक याची ओळख पटवुन आरोपी निष्पन्न करणे व आरोपीस अटक करून गुन्हा उघडकीस आणणे बाबत तपासी अधिकारी यांना मार्गदर्शन करून आदेशित केले होते.

मृतक याची ओळख पटविण्या करीता परीसरातील मागील काही काळात हरविलेले मिळुन न आलेल्या ईसमांच्या अभिलेखाची तपासणी केली असता ग्राम एकलविहीर येथील शेषराव वासुदेव ईरपाची हा काही महीन्यापुर्वी
हरविला असुन अद्याप मिळुन न आल्याने त्याची पत्नी नामे रंजना शेषराव ईरपाची हिचा शोध घेतला असता ती ग्राम
शहापुर येथे दुस-या पुरुषा सोबत राहत असल्याचे माहीती मिळाली वरुन तिला मृतक हयाचे कपडे दाखविले असता
ते तिच्या वर नमुद पतीचेच असल्याचे तिने ओळखले.

पोलीसांनी नमुद महीला व ती ज्या सोबत राहत होती तो ईसम नामे ज्ञानेश्वर किसनराव कुमरे यांची कसून चौकशी केली असता सदर महीलेचे व ज्ञानेश्वर कुमरे यांचे अनैतिक संबंध असुन सदर बाब महीलेचा मृतक पती हयाला माहीत पडल्याने तो तिला मानसिक व शारीरीक त्रास देत होता.

सदर त्रासाला कंटाळुन रंजना हिने ज्ञानेश्वर कुमरे याचेसांबत कट रचुन कु-हाडीने शेषराव ईरपाची याचे मानेवर सपासप वार करुन मुंडके धडा वेगळे करुन शरीराचे तुकडे करुन पोत्यात भरुन विहीरीत फेकुन दिले असल्याची कबुली दिली
आहे. नमुद दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस
अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. डॉ. निलेश पांडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, मोर्शी यांचे मार्गदर्शनात श्री. प्रदीप
चौगांवकर, ठाणेदार पो.स्टे. वरूड, पो.उप.नि. धिरज राजुरकर, दिपक वळवी,

मंगेश शेगोकार पोलीस अमलदार राजु मडावी, दिलीप राउत, किरण दहीवाडे, समीर धांडे, रत्नदिप वानखडे, विनोद पवार, सचिन भगत, राजु चव्हाण, प्रफुल्ल लेव्हरकर, किरण गावंडे यांचे पथकाने केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: