Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsअमरावती | शहरातील भंगार सिटी बसेसची दुरुस्ती कधी?...ब्रेक निकामी झालेल्या बसने चौघांना...

अमरावती | शहरातील भंगार सिटी बसेसची दुरुस्ती कधी?…ब्रेक निकामी झालेल्या बसने चौघांना चिरडले…चिमुकल्याला मृत्यु…

अमरावती (प्रतिनिधी): शहरातील खाजगी बस सेवा अत्यंत बोगस असल्याचे चित्र काल समोर आलाय, आजीसोबत एका धार्मिक कार्यक्रमाला जात असलेल्या चुलत बहीण-भावाला शहर बसने धडक दिली. या अपघातात बसच्या चाकाखाली चिरडून भावाचा मृत्यू झाला. तर बहीण जखमी झाली. अपघानंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायन्सकोर प्रांगणाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रितम गोविंद निर्मळे (9) असे मृतक तर वैष्णवी संजय निर्मळे (12) असे जखमी मुलीचे नाव आहे. शिरजगाव कसबा येथील रहिवासी नर्मदा लक्ष्मणराव निर्मळे (60) ह्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी सकाळी नातू प्रितम, नाती वैष्णवी व नेहा संतोष निर्मळे (14) यांच्यासह एसटी बसने अमरावतीला आल्या. मध्यवर्ती बसस्थानकावर उतरल्यावर ते सर्व पायदळ सायन्सकोर प्रांगणाच्या द्वारासमोरून रुक्मिणीनगर चौकाकडे धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनस्थळी जात होते.

त्यावेळी मागून आलेल्या शहर बस क्रमांक एमएच 27 ए 9952 ने अचानक प्रितम व वैष्णवीला धडक दिली. या अपघातात प्रितम हा बसच्या चाकाखाली आला. त्यात चिरडून त्याचा करुण अंत झाला. तर वैष्णवी ही जखमी झाली. अपघातानंतर आजी नर्मदा यांनी एकच आक्रोश केला. तर संतप्त जमावाने बसची तोडफोड केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. याबाबत माहिती मिळताच कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पोलिसांनी जखमी वैष्णवीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

शहरात चालणार्या बहुतेक बसेस ह्या भंगार आहेत, बर्याच दिवसांपासून या दुरस्ती देखभाल झाली नाही, सोबतच काही बसचे ब्रेक सुद्धा लागत नसल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे. तर चालक मद्य प्राशन करून बस चालवितात अशी धक्कादायक माहिती महाव्हाईसच्या सूत्रांनी सांगितली असून बस ठेकेदार भंगार बसेस ची दुरुस्ती करणार का?सोबतच मद्य प्राशन करणाऱ्या चालकांना कामावरून कमी करणार का?..असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: