Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | पिंपळखुटा येथील विलास कोठे हत्याकांडाचा पर्दाफाश...मास्टरमाईंडसह ४ आरोपी अटकेत...फ्रेजरपुरा पोलिसांची...

अमरावती | पिंपळखुटा येथील विलास कोठे हत्याकांडाचा पर्दाफाश…मास्टरमाईंडसह ४ आरोपी अटकेत…फ्रेजरपुरा पोलिसांची कौतुकास्पद कामगीरी…

अमरावती : फ्रेजरपुरा हद्द्दीत येत असलेल्या पिंपळखुटा येथील विलास कोठे खून प्रकरणाला वेगळेच वळण आले असून ४० हजारांची सुपारी देऊन विलासचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी सुपारी देणाऱ्याला सोमवारी दि.4/9/2023 सायंकाळी अटक केली. सुरेंद्रकुमार कुसुमाकर ठोसर (राहणार पिंपळखुटा) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३१.०८.२०२३ रोजी पिंपळखुटा गायराण परीसरात दुर्गंधी येत असुन पळसाचे झाडाजवळ जमिनीवर खडडा करून त्यावर मीठ टाकुन असल्याबाबत फिर्यादी राजेश देवरावजी कोठे वय ५५ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. ग्राम पिंपळखुटा, ता. जि. अमरावती यांनी पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे कळवुन त्याचा चुलतभाउ मयत नामे विलास रंगराव कोठे, वय ४५, व्यवसाय मजुरी, रा. ग्राम. पिंपळखुटा, ता. जि. अमरावती यास जगदीश वाकडेची मोठी मुलगी राणी वाकडे हिचेवर वाईट नजर ठेव कारणावरून जिवानीशी मारून टाकुन गायरान जमीनीत गाडून टाकले, असे समजल्याने बाबत गायरान जमीनीत शोध घेतला असता तेथे एका पळसाचे झाडाजवळ माती उकरलेली दिसुन आली, त्यावर मीठ व काठया टाकलेल्या दिसुन आल्याने त्या ठिकाणी पोलीस, तहसीलदार साहेब, पंच, मेडीकल ऑफीसर यांचे समक्ष उकरलेल्या मातीचे ठीकाणी खडडा करून शोध घेतला असता तेथे मानवी हाडांचा सांगाडा, कपडे व थोडे मास दिसुन आले, त्याचेवरील कपडयांवरून सदर सांगाडा मयत विलास कोठे याचा असल्याचे फिर्यादीने ओळखले. यावरून जगदीश वाकडे, सुमीत कावरे, अविनाश धरमे यांनी फिर्यादीचा चुलत भावास जिवानीशी मारून जमीनीत पुरले म्हणुन फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे अप क्र ७०५/२०२३ भा.दं.वि कलम ३०२, २०१,३४, १२० ब प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचा तपास करता सदर गुन्हयातील प्रथम आरोपीत नामे सुमित मधुकर कावरे, रा. विहाराजवळ, पिंपळखुटा, ता.जि.अमरावती यास लागलीच ताब्यात घेउन गुन्हयाबाबत अधिकची माहीती प्राप्त करण्यात आली व त्याचे माहीतीवरून आरोपी क २) श्री जगदीश चिंतामण वाकडे, रा. पिंपळखुटा, ता. जि. अमरावती ३) श्री सतीष उर्फ अविनाश सुरेशराव धर्मे, रा. ग्राम पिंपळखुटा, अमरावती यास ताब्यात घेउन गुन्हयाबाबत कौशल्यपुर्ण तपास करता गुन्हयातील मुख्य आरोपी नामे ४) सुरेंद्रकुमार कुसुमाकर ठोसर, व्यवसाय नेचरोपॅथी डिप्लोमा, रा. हनुमान मंदीराजवळ, ग्राम पिंपळखुटा, ता. जि. अमरावती यास अटक करण्यात आली. तपासात आरोपी क ४ सुरेंद्रकुमार ठोसर यांची मयत विलास कोठे यांचेशी वाद असल्याने तो सुरेंद्र ठोसर यास शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होता. तसेच आरोपी मयत विलास कोठे याने आरोपी क्र. २ जगदीश वाकडे हीचे मुलीला अश्लील शिवीगाळ केल्याने जगदीशचे वाकडेच्या मनात विलास कोठे बददल राग होता. याच बाबीचा फायदा घेउन आरोपी क्र ४ सुरेंद्रकुमार ठोसर याने जगदीश वाकडे हयास मयत विलास कोठे यास जिवानीशी मारण्याची सुपारी ४०,०००रु मध्ये दिल्याने आरोपी जगदीश वाकडे याने त्याचे साथीदार सुमीत कावरे व अविनाश उर्फ जगदीश धर्मे यासह दि. ०३/०८/२०२३ रोजी मयत विलास कोठे यास कटुले आणण्याचे बहाण्याने पिंपळखुटा गायराण येथे नेउन त्यास गळफास देउन मारून टाकले व दि. ०४/०८/२०२३ रोजी पळसाचे झाडाखाली खडडा करून गाडुन टाकले. मृत शरीराची दुर्गधी येउ नये म्हणुन त्यावर मीठ टाकल्याचे त्याने कबुल केले आहे. तरी गुन्हयात सर्व चारही आरोपींना अटक करण्यात आली असुन सदरचे आरोपी पोलीस कोठडी मध्ये असुन तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सो, मा. पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा परिमंडळ १ श्री सागर पाटील सो, मा. सहा पोलीस आयुक्त फ्रेजरपुरा विभाग, श्री. प्रशांत राजे सो, यांचे मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र सहारे, पोउपनि आकाश वाठोरे, पोहवा / १०१५ योगेश श्रीवास, पोहवा / ४४८ विनोद इंगळे, नापोका १३५३ / शशिकांत गवई, नापोका / १२६२ अमोल पाटील, नापोका /५६ सुहास शेंडे, नापोका / ९२४ हरीश बुंधेले, नापोका / ४६९ हरीश चौधरी, नापोका / ३२५ श्रीकांत खडसे, मापोका /५६३ संतोष नागे, पोशि/ ५९१ सतिष सावरकर, पोशि/ १५२१ धनराज ठाकुर, चालक जापोका / १२८४, अमोल राठोड, चालक पोशि/ १८०३ उमेश पुलपार, पोशि/ ४४७ मुसाईद शेख, पोशि/ १३५१ सचिन मेश्राम यांनी केलेली आहे. तपासकामी पोलीस मित्र पिंटु अर्मड (पाटील) यांनी मोलाचे सहकार्य केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: