पातूर – निशांत गवई
बॉडी बिल्डर्स ॲन्ड फिटनेस असोसिएशन, विदर्भ यांच्या मान्यतेने व बु.गोवर्धनजी पोहरे बहुद्देशीय शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ,पातूर यांच्या वतीने भव्य विदर्भ स्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा भिम श्री-2023 संपन्न झाली.
पातूर शहरात उत्सव मंगल कार्यालय,खानापूर रोड, पातूर ता.पातूर जि. अकोला येथे विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग भीम श्री – 2023 संपन्न झाली.या स्पर्धेचे उदघाटन बाळापूर विधानसभेचे आमदार नितीन देशमुख तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र पातोडे,प्रदेश नेते वंचित बहुजन आघाडी लाभले तर प्रमुख उपस्थितीत सै. बुऱ्हाण सै.नबी, वंचित जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष करण वानखडे,निलेश इंगळे, संतोष गवई, ॲड. सुबोध डोंगरे, जिल्हा सचिव आनंद डोंगरे,
श्रीकृष्णा देवकुणबी,सागर रामेकर, परशराम उंबरकार, शंकर देशमुख, सुरेंद्र उगले,निरंजन बंड, सुधाकर शिंदे,राजेंद्र इंगळे,सिद्धार्थ वरोटे, सचिन शिराळे,शितल ठाकूर,गुलाब उमाळे,साजिद सर,आदी वंचित बहुजन आघाडी व शिवसेना(ठाकरे गट) पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेत 00- 60 की.ग्रा. गटात सैय्यय निसार प्रथम,संकेत भगत द्वितीय,निखिल उके तृतीय,प्रफुल बनकर चौथा,अब्दुल अलीम पाचवा, 60- 65 की.ग्रा.वजनगटात प्रथम राजेश क्षीरसागर, द्वितीय विक्की पेंदाम,तृतीय रोशन भजनकर,चतुर्थ तुषार पडीगेल,पाचवा अब्दुल साकीब, 65- 70 की.ग्रा.गटात प्रथम शेख अब्रार,दुसरा शेख सलीम,तृतीय राजन ठुमते, चौथा मो.दानियल, 70- 75 की.ग्रा. गटात प्रथम शोएब अहमद , द्वितीय आनंद खैरे,
तृतीय अल्ताफ पठाण,चौथा प्रफुल्ल मिश्रा,पाचवा अर्जुन अंभोरे,75- 80 की.ग्रा.गटात प्रथम प्रसाद थोटे, द्वितीय अवेश खान,तृतीय राज अटकापुरवार, चौथा सागर गायकवाड, पाचवा राज बांगरे,व 80 की.ग्रा.वरील गटात प्रथम क्रमांक विजय भोयर, द्वितीय निलेश जोगी, तृतीय आकाश दूब्बलवार,चौथा मोहम्मद तन्वीर, पाचवा अक्षय पतंगराज यांनी बाजी मारली.
पातूर शहरात प्रथमच झालेल्या भीम श्री – 2023 विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे रनर अप म्हणून शोएब अहमद तर भिम श्री-2023 चे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विजय भोयर,अमरावती यांनी हा खिताब पटकाविला. सदर कार्यक्रमासाठी स्पर्धेचे आयोजक निर्भय पोहरे(पश्चिम भारत श्री), करण वानखडे सर, स्वप्निल सुरवाडे, प्रविण पोहरे,विकास सदार,धिरज खंडारे,निहार घुगे,अनिकेत पोहरे,राजेंद्र पोहरे,अक्षय पोहरे,प्रविण किरतकार यांनी अथक परिश्रम घेतले.
पातूर शहरात संपन्न झालेल्या विदर्भ स्तरीय बॉडी बिल्डिंग भिम श्री 2023 स्पर्धेदरम्यान के.डब्ल्यू. फिटनेस सेंटर चे संचालक तथा कोच करण वानखडे यांनी डेमो दिला,व बॉडी बिल्डिंग या खेळासाठी वय मायने ठेवत नसून केवळ जिद्द पाहिजे याचे जिवंत उदाहरण दिले.वयाच्या 40 व्या वर्षी देखील करण वानखडे यांनी एका खेळाडूला वयाचे बंधन नसून केवळ जिद्द हवी याचा प्रत्यय आणून दिला.
पातूर शहरात झालेल्या विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग भिम श्री-2023 स्पर्धेदरम्यान प्रथम कठने,रा.अकोला या दिव्यांग युवकाने डेमो दिला असता उपस्थित प्रेक्षक व जजेस यांची मने जिंकली असून दिव्यांग देखील सामन्यांपेक्षा कमी नाहीत याची प्रचिती त्याने दाखविली.