Sunday, December 22, 2024
HomeBreaking Newsअमरावती | लासुर शेतशिवारात वीज पडुन मजुराचा दुर्दैवी मृत्यू...दोन गंभीर जखमी...

अमरावती | लासुर शेतशिवारात वीज पडुन मजुराचा दुर्दैवी मृत्यू…दोन गंभीर जखमी…

अमरावती : दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर-अकोला रोडवरील लासुर शेतशिवारात वीज पडुन मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.15 जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. मोराज रामचंद्र खडे(वय 42) रा.रामतीर्थ असे मृत मजुराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज लासुर येथील वासुदेवराव राऊत यांच्या शेतात पेरणीकरिता मजूर म्हणून काम करत असतांना दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासोबत पाऊस सुरू झाल्याने मजूर शेतीतील निबाच्या झाडाखाली जाऊन उभे राहिले असता अचानक वीज पडल्याने मोराज रामचंद्र खडे(वय 42)रा.रामतीर्थ या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर बाळू लोणकर रा.रामागड व चंद्रशेखर अभ्यंकर रा.लासुर हे जखमी झाले आहेत.

त्यांना उपचारासाठी तात्काळ दर्यापूर येथे सरकारी दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले आहे असून त्यांची प्रकृती चांगली आहे.

या घटनेची माहिती मिळताच दर्यापूर मतदार संघाचे आमदार बळवंतराव वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब हिंगणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट व देवमजी भावर आणि रणशेराव लाजुरकर व कोळी महा संघ कार्यकर्ता यांनी घटना स्थळी धाव घेत जखमी रुग्णाची भेट घेतली.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: