Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | बडनेरा-अकोला रोडवरील दडबडशाह बाबा दर्ग्यात दोघांची हत्या !...

अमरावती | बडनेरा-अकोला रोडवरील दडबडशाह बाबा दर्ग्यात दोघांची हत्या !…

अमरावती शहरासह आता शहराबाहेरही हत्येचं सत्र थांबायचं नाव घेत नसून बडनेराजवळच असलेल्या अकोला रोडवर एक खळबळजनक घटना समोर आलीय, महामार्गावर लागून असलेल्या अकोला रोडवर दडबडशाह बाबा दर्ग्यात दोन इसमांचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळले आहेत, मृतांची अवस्था बघून दोघांची निर्घुण हत्या करण्यात आल्याचे समजते. हत्येच्या घटनेची माहिती होताच बडनेरा व लोणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुजावर अन्वर (50, लालखडी) व कारंजा येथील रहिवासी व तौसिफ (२५) असे मृतांचे नाव आहे. रात्री दोघेही दर्ग्याच्या आवारात झोपले होते. हत्येच नेमकं कारण अद्यापही समोर आले नाही. मध्यरात्री अज्ञात आरोपींनी या दोघांवर जीवघेणा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. एकाच्या गळ्यावर व छातीवर धारदार शस्त्राने वार करून दोघांची हत्या करण्यात आली.

घटनास्थळी जेव्हा पोलीस पोहचले तेव्हा दोन्ही मृतदेह रक्ताने माखलेले आढळले, हे प्रकरण आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली लोणी व बडनेरा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल, तपास सुरू घटनास्थळ कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता सीपी आरती सिंह देखील माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले.
गुन्हे शाखेचे अधिकारी आणि श्वान पथकही घटनास्थळी पोहोचले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: