Saturday, November 16, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | दोन भामट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत वृध्द महिलेस मारहाण...

अमरावती | दोन भामट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत वृध्द महिलेस मारहाण करून केली जबरी चोरी…आता स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद…

अमरावती : जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात असलेलेया बेलज या गावातील वृध्द महिलेला दोन भामट्यांनी जखमी करून तिच्या अंगावरील दागिने हिसकावून नेले होते. त्या दोन चोरट्यांना अमरावतीच्या ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने पकडून जेरबंद केले आहे. ०१) मोहम्मद इद्रिस मोहम्मद इशाख वय ३२ वर्ष रा. अशरफपुरा, अचलपुर
०२) मोहम्मद जबी फरात मोहम्मद जाकिर वय २३ वर्ष रा. अलकरीम कॉलनी, अचलपुर असे आरोपींचे नाव असून त्यांच्या कडून एकुण ७०,००० रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला.

दिनांक ०१/०६/ २०२३ रोजी फिर्यादी नामे सौ. कांता महादेवराव ठाकरे वय ७३ वर्ष रा. बेलज ता.दिनांक ०१/०६/ २०२३ रोजी फिर्यादी नामे सौ. कांता महादेवराव ठाकरे वय ७३ वर्ष रा. बेलज ता.चांदुरबाजार यांनी पोलिस स्टेशन सरमसपुरा येथे फिर्याद दिली कि, त्या ग्राम बेलज येथे घरी एकटया हजर असता कोणीतरी अज्ञात इसमांनी पिण्यासाठी पाणी मागितले व घरी कोणी नसल्याचे पाहुन फिर्यादी यांचे कानातील सोन्याचे कानातले आणी गळयातील सोन्याचे मणी असलेली पोत एकुण ०४ ग्रॅम किमंत ६०००रु मारहाण करुन जबरीने हिसकावुन चोरुन नेली, ज्यामुळे फिर्यादीचे डोक्याला, कानाला जखम झाली.

अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पो स्टे.सरमसपुरा येथे गुन्हा रजि.क.१४९/२३ कलम ३९४,३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य पाहता मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रा. यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर गुन्हातील आरोपींची ओळख पटवून आरोपी निष्पन्न करणे व आरोपीस अटक करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. श्री. तपन कोल्हे यांनी घटनास्थळाला भेट देवुन सदर गुन्हा उघडकिस आणने कामी सपोनि रामेश्वर धोडंगे व सचिन पवार यांचे पथक नेमुण गुन्हा उघडकिस आणनेबाबत आवश्यक त्या सुचना दिल्या. त्या अनुषगांने स्थागुशा पथकानी तपासा दरम्यान मिळालेल्या तांत्रिक पुराव्यावरुन संशयित इसम मोहम्मद इद्रिस मोहम्मद इशाख वय ३२ वर्ष रा. अशरफपुरा अचलपुर आणि मोहम्मद जबी फरात मोहम्मद जाकिर वय २३ वर्ष रा. अलकरीम कॉलनी, अचलपुर यांना दिनांक ०४/०६/ २०२३ रोजी १६/०० वा सुमारास अचलपुर येथुन ताब्यात घेवुन नमुद संशयित इसमांना सदर गुन्हया संबधाने सखोल विचारपुस केली असता दोन्ही आरोपींनी गुन्हांची कबुली दिली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातुन दोन स्मार्ट फोन कि.अं. २०,००० रु, गुन्हात वापरलेली हिरो कंपणीची मोटर सायकल कि.अ. ५०,००० रु असा एकुण ७०,००० रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला.

पुढील तपासकामी दोन्ही आरोपींना जप्त मुददेमालासह पो.स्टे. सरमसपुरा येथे देण्यात आले आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ सा, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनात सपोनि रामेश्वर घोडंगे, सपोनि सचिन पवार, पोउपनि नितीन चुलपार, पोलिस अंमलदार संतोष मंदाने, युवराज मानमोठे, रविंद्र बावने, स्वप्निल तंवर, रविंद्र व-हाडे, पंकज फाटे, सागर नाठे, सायबर पोलीस स्टेशनचे अंमलदार सागर धापड, रितेश वानखडे, चेतन गुल्हाने, चालक मंगेश मानमोठे, संजय प्रधान यांचे पथकाने केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: