Saturday, December 21, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | ५५ हजारांची लाच घेतल्या प्रकरणी PSI सह दोघांना अटक...

अमरावती | ५५ हजारांची लाच घेतल्या प्रकरणी PSI सह दोघांना अटक…

अमरावती- वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले PSI यांच्या खाजगी सहकाऱ्यांना 55 हजाराची लाच घेतांना लाचलुचपत विरोधी पथकाने रंगेहात पकडले असून PSI सह त्यादोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. लाच घेतांना सहकरी बनावट खत प्रकरणात आरोपी न करण्यासाठी ५५ हजारांची मागणी केली होती. ही कारवाई गुरुवारी शहरातील नवसारी भागातील एका हॉटेलसमोर करण्यात आली.

वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पीएसआय अयुब हिराजी शेख (३९) व खासगी व्यक्ती मिलिंद दादाराव चौधरी (४०), रा. हर्षराज कॉलनी, अमरावती अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांशिवाय मकसुद अली कादर अली (रा. सौदागरपुरा, वलगाव) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. वलगाव पोलिस ठाण्यात सुमारे दीड महिन्यांपूर्वी बनावट खत प्रकरणात गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तक्रारकर्त्याला पोलिस उपनिरीक्षक अयुब शेख यांनी मिलिंद चौधरी व मकसुद अली या दोघांच्या माध्यमातून ६० हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५५ हजारांत व्यवहार ठरला. याबाबत तक्रारकर्त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी तक्रार दाखल केली. एसीबीने पडताळणी करून गुरुवारी दुपारी सापळा रचला. यावेळी मिलिंद चौधरी याने लाच स्वीकारताच त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अयुब शेख यांनाही अटक करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: