Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsअमरावती | शहरातील १२ घरफोडी गुन्हातील दोन आरोपींना केले जेरबंद...गुन्हेशाखा २ ची...

अमरावती | शहरातील १२ घरफोडी गुन्हातील दोन आरोपींना केले जेरबंद…गुन्हेशाखा २ ची धडाकेबाज कारवाई…

अमरावतीच्या गुन्हेशाखा युनिट-२ अमरावती शहर, यांची उल्लेखनीय कामगिरी अमरावती शहरातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून चोरी करणारे २ आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून एकुण १२ गुन्हयातील ७,२५,०००/- रूचा मुददेमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस आयुक्त श्री नविनचंद्र रेडडी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दिनांक २१/०५/२०२४ रोजी फिर्यादी नामे रूपेश श्रीधर बेलसरे रा. पंचवटी कॉलनी, अमरावती यांनी पो.स्टे. गाडगेनगर येथे तक्रार दिली की, दिनांक १५/०५/२०२४ रोजी ते कुटूंबासह बाहेरगावी गेले होते. सहा दिवसानंतर ते घरी परत आले तेंव्हा त्यांना घरच्या मुख्य लाकडी दरवाजाचे लॉक तुटलेले दिसले तसेच त्यांनी बेडरूम मधील कपाट तपसाले असता कपाट तुटलेले दिसले कपाटामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागीणे व रोख तसेच सिसिटीव्ही चा डीव्हीआर असा एकूण ३७,००० रू चा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला. अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. गाडगेनगर येथे अप. क्र. ४७८/२०२४ कलम ४५४, ४५७,३८० भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मा. पोलीस आयुक्त, श्री नविनचंद्र रेडडी साहेब यांनी आदेशीत केल्यावरून मा. पोलीस निरीक्षक, श्री राहुल आठवले, गुन्हे शाखा युनिट क्र. २ यांच्या नेतृत्वात सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पथकाला गुप्त बातमीदाराच्या माहिती वरून तसेच तांत्रिक विश्लेषण वरून गुन्हयातील आरोपी नामे १) महबूब खान वल्द समीउल्ला खान, वय ३१ वर्ष रा. लालखडी, इमाम नगर अमरावती, २) मोहम्मद शोएब वल्द मोहम्मद शाबिर वय ३१ वर्ष रा. नालसाबपुरा,अमरावती,यांना ताब्यात घेवून त्यांची कसोशीने व कौशल्यपुर्ण पध्दतीने चौकशी करून त्यांना विश्वासात घेवून गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.

त्यांचे ताब्यातून अमरावती शहरातील एकूण १२ घरफोडीच्या गुन्हयातील एकूण ७,२५,०००/- रूचा मुददेमाल जप्त करून गुन्हे उघडकिस आणले. ‘अमरावती शहरातील घरफोडींच्या गुन्हयांवर आळा बसावा याकरीता मा. पोलीस आयुक्त, श्री नविनचंद्र रेडडी साहेब, मा. पोलीस उपायुक्त श्रीमती कल्पना बारवकर मॅडम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शिवाजी बचाटे साहेब यांनी गुन्हे शाखा यांची मिटींग घेवून सदरचे गुन्हे उघडकिस आणणेबाबत आदेशीत केल्याने गुन्हे शाखा युनिट क्र. २ चे पथकाने गुप्त माहितीचे तांत्रीक विश्लेषण करून पथकाने अहोरात्र प्रयत्न करून सदरचे गुन्हे उघडकिस आणले ते खालील प्रमाणे सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. नवीनचंद्र रेड्डी साहेब, मा. पोलीस उपायुक्त श्रीमती कल्पना बारवकर मॅडम, मा. पोलीस उपायुक्त श्री. गणेश शिंदे, मा. पोलीस उपायुक्त श्री. सागर पाटील साहेब, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शिवाजी बचाटे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक श्री. राहुल आठवले, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, सपोनि सत्यवान भुयारकर, पोउपनि संजय वानखडे, सपोउपनि राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार :- जावेद अहमद, गजानन ढेवले, दिपक सुंदरकर, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, नईम बेग, चंद्रशेखर रामटेके, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे, संदीप खंडारे यांचे पथकाने केली आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: