अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोणा खुर्माबाद गावातील चंदन गुजर नावाच्या ३८ वर्षीय क्रूर व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या परिवारावर प्राणघातक हल्ला करून तिघांना ठार व तिघांना गंभीर जखमी केले आहे. काल रात्री ८:३० वाजताच्या दरम्यात हे घटना घडली असून मृतांमध्ये अनुसया अंभोरे (६७), शामराव अंभोरे (७०) आणि अनारकली गुजर (५५) यांची क्रूर हत्या केली. तर आता या घटनेतील मुख्य आरोपीसह एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पो.स्टे. खल्लार येथे फिर्यादी नामे किशोर शामराव अंभोरे, वय ३७, रा. नाचोणा यांनी तक्रार दिली की, दि.१९/१२/२०२३ रोजी सायंकाळी ०७.३० वा. दरम्यान ते स्वतःचे चिकनचे दुकान बंद करून घरी परत आले तेव्हा त्यांचे घरासमोरच राहणारा आरोपी नामे चंदन राधेश्याम गुजर, वय ३२, रा. नाचोणा हा फिर्यादी यांचे शेजारीच राहणारे त्यांचे मामा यशवंत साठे, रा. नाचोणा यांचे घरासमोर उभा होता. त्यावेळी आरोपीने फिर्यादीस बोलावले व सांगीतले की, तुझ्या कुत्र्याने माझी कोबंडी पकडली त्यावर फिर्यादी यांनी सांगीतले की सदरचा कुत्रा हा त्यांचा पाळीव नसुन त्याबाबत त्यांना काही माहीती नाही व ते घराकडे जायला निघाले असता आरोपीने फिर्यादीस अश्लिल भाषेत शिविगाळ केली.
फिर्यादी व आरोपी यांचे वाद झाला तेव्हा फिर्यादी यांनी आरोपीस २-३ थापडा मारल्यात हे पाहताच आरोपीताचे वडील नामे राधेशाम गोविंद गुजर वय ६०, रा. नाचोणा हे फिर्यादीचे अंगावर कु-हाड घेवुन मारण्याचे उद्देशाने चालुन आले. सुरू असलेल्या वादाचा आवाज ऐकुन फिर्यादीचे वडील शामराव अंभोर वय ७०, आई अनुसया अंभोरे वय ६०, भाऊ उमेश अंभोरे वय ४२, वहीनी शारदा अंभोरे वय ३९ तसेच बहीण सुमित्रा चव्हाण वय ४६ सर्व रा. नाचोणा हे त्या ठिकाणी एकत्रीत आले होते त्या सर्वानी फिर्यादीची समजुत काढुन त्यास घरात पाठविले.
काही वेळातच फिर्यादीस गाडीचा रेस केल्याचा मोठयाने आवाज आला असता तो घराबाहेर आला व पाहीले की आरोपी चंदन गुजर याने रागाचे भरात त्याची चारचाकी ईको क्रं.एम.एच.२७/ डी.ई. ७४६१ ही जोराने पळवित आणुन फिर्यादीचे घरासमोर उभे असलेले त्याचे वडील शामराव अंभोरे, आई अनुसया अंभोरे यांना समोरा- समोर जोरदार धडक देवुन पुढे निघुन गेला.
धडक बसल्याने फिर्यादीचे वडील, आई खाली पडले त्यावेळी फिर्यादी, त्याचा भाऊ उमेश अंभोरे, वहीनी शारदा अंभोरे, बहीण सुमित्रा चव्हाण व शेजारी अनारकली गुजर हे आई-वडीलांना उचलण्या करिता त्यांचे जवळ गेले तेव्हा आरोपीने गाडी पुन्हा परत वळवून गाडी सुसाट वेगाने त्यांचे अंगावर आणली असता फिर्यादी व इतर रस्त्याचे बाजुला पळुन गेले, त्यावेळी आरोपी चंदन याने त्याची गाडी जखमी पडलेल्या वडील शामराव अंभोर,
आई अनुसया अंभोरे व त्यांना उचलण्या करिता गेलेल्या शारदा अंभोरे व अनारकली गुजर यांचे अंगावरून नेली. त्यांना धडक बसल्याने त्या सुध्दा खाली पडुन जखमी झाल्यात. त्यानंतर आरोपीचा गाडीचा ताबा सुटून गाडी रस्त्याचेकडेला खड्डयात गेली तेव्हा आरोपी हा गाडी सोडुन जंगलात पळुन गेला. सदर घटने नंतर जखमी यांना खाजगी वाहनाने गावातील नागरीक व नातेवाईक यांचे मदतीने दर्यापुर येथील रूग्णालयात नेले असता फिर्यादीचे वडील नामे शामराव अंभोरे, आई अनुसया अंभारे, शेजारी अनारकली’ ‘गुजर मरण पावले असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगीतले तसेच फिर्यादीची वहीनी सौ. शारदा अंभोरे, भाऊ उमेश अंभोरे व फिर्यादी हे स्वतः जखमी असल्याने त्यांचेवर प्राथमीक उपचार करण्यात आले असुन सौ. शारदा अंभोरे ही गंभिर जखमी असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालय,
अमरावती येथे पुढील उपचारा करिता दाखल करण्यात आले आहे. वरील प्रकरणात पो.स्टे. खल्लार येथे आरोपी नामे १) चंदन राधेश्याम गुजर, वय ३२, २) राधेश्याम गोविंद गुजर, वय ६० दो. रा. नाचोणा यांचे विरूध्द पो.स्टे.खल्लार येथे खुन,खुनाचा प्रयत्न ई. कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर घटनेची माहीती मिळताच व गांभीर्य पाहता घटना स्थळावर मा. श्री. विशाल आंनद, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. विक्रम साळी, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. गुरूनाथ नायडु, उप-विभागीय पोलीस अधिकारी, दर्यापुर यांनी भेट दिली व गुन्हयातील फरार आरोपी यांचा शोध घेवुन त्वरीत अटक करणेकामी स्था.गु.शा. चे ०३ व पो.स्टे.खल्लार चे ०२ असे एकुण ०५ पथके तयार करून रवाना करण्यात आले होते.
पो.स्टे. खल्लार च्या पथका व्दारे आरोपी राधेश्याम गोविंद गुजर, वय ६० दो. रा. नाचोणा यास ताब्यात घेण्यात आले होते. तसेच आरोपी चंदन राधेश्याम गुजर, वय ३२, हा अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले होते करिता सदर आरोपीचा परिसरात रात्रभर शोध घेण्यात आला असता आज रोजी त्यास कोकर्डा शेतशिवारात ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाव्दारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की सदर घटनेचे अनुषंगाने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कुठलेही आक्षेपार्ह संदेश किंवा फोटो समाजमाध्यमांवर टाकु नये असे काही आढळुन आल्यास त्वरीत पोलीसांशी संर्पक साधावा. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ग्राम नाचोणा व दर्यापुर परिसरात पोलीसांची अतिरीक्त कुमक नेमण्यात आली असुन गावात व परिसरात शांतता आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. विशाल आंनद, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. मा. श्री. विक्रम साळी, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामिण, श्री. गुरूनाथ नायडु, उप-विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात पो. नि. किरण वानखडे, स.पो.नि.चन्द्रकला मेसरे, पो.उप.नि.संजय शिंदे, मोहम्मद तसलीम, मुलचंद भांबुरकर तसेच पो.स्टे. खल्लार व स्था.गु.शा. येथील पोलीस अमंलदार यांचे संयुक्त पथकाने केली आहे.