अमरावतीत वाढत्या चोरींच्या घटनावर अंकुश लावण्यासाठी सतर्क असलेली गुन्हे शाखा युनिट क्रं.०१ आसाराम चोरमले, पोलीस निरिक्षक यांच्या टीमने दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना साहित्यासह अटक केल्याने चोरींची मोठी घटना होण्यापासून वाचविली. पोलीस स्टेशन नादगावपेठ च्या अंतर्गत येत असलेल्या सेलीब्रेशन लॉनच्या माघे अशोक विहार येथे चोरट्यांचा दरोडा टाकण्याचा मोठा प्रयत्न या टीम ने हाणून पाडला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. 1) सैयद तोसिफ सैयद आसिफ वय 21 वर्षे, 2) अहेमद बेग वल्द रशीद बेग वय 23 वर्ष, 3) शेख जमील वल्द शेख मुस्ताक वय 22 वर्ष सर्व रा. लालखडी. असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, देशमूख लॉन तसेच शिवनेरी नगर भागात चोऱ्या व घरफोडी होत असल्याने पोलीस आयुक्त अमरावती शहर यानी सदर भागात रात्रीची गस्त प्रभावी पणे व गुन्हाना प्रतिबंध करण्याबाबत आदेशित केल्याने फिर्यादी हे स्टाफसह सदर भागात पेटोलीग करत असताना वर नमूद घटनास्थळी घतावेळी पाच इसम घोळक्याने बसलेले दिसले तसेच त्यांचे बाजूला दोन गाडया उभ्या दिसल्या फिर्यादी व स्टाफने घेराव घालून त्या इसमांना पकडण्याचा प्रयत्न केला असता वर नमूद आरोपी हे पकडण्यात आले व त्याचे कडून वरिल मुददेमाल जप्त करण्यात आला व इतर दोन आरोपी हे अंधाराचा फायदा घेवून पळून गेले नमूद आरोपी दरोडा टाकण्याचे उददेशाने पूर्व तयारी करून शस्त्र बाळगून एकत्र मिळून आल्याने त्याचे विरूदध कलम 399,402 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपी हे रेकॉर्डवरिल आरोपी असून त्याचे विरूदध चोरीचे व इतर गुन्हे नोंद आहे सदर आरोपीकडून तपास करून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता असून सदर गुन्हाचा तपास सुरु आहे
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, नवीनचन्द्र रेडडी सर, मा. पोलीस उपआयुक्त मा. सागर पाटील सर सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. प्रशांत राजे सर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट क्रं. 01 चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजूआपा, फिरोज खान, सतीष देशमूख, नाईक पोलीस अमंलदार दिनेश नांदे, विकास गुडदे, पोलीस अमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्तीकाकड, अमोल मनोहरे, चालक अमोल बाहदरपूरे, भूषन, आकाश काबंळे, किशांर खेंगरे यानी केलेली आहे.