काल अमरावती शहरातील संमती शिक्षक वसाहतीत शिक्षित मायलेकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदय पिटाळून टाकणारी घटना घडली होती, सदर घटनेची शहरात हळहळ व्यक्त केली जात होती. तर या घटनेचे मुख्य कारणही आता समोर आले आहे.
शहराच्या संमती शिक्षक कॉलोनीत राहणाऱ्या मायलेकी सुवर्णा प्रदीप वानखेडे (50) आणि मुलगी मृणाल प्रदीप वानखेडे (23) यांच्या आत्महत्येस महिलेचा पती प्रदीप रंगराव वानखेडे (55) हाच जबाबदार असल्याचे गाडगे नगर पोलिसांनी सांगितले, त्याच्यावर आयपीसी कलम 498 (ए), 306 अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली. या घटनेची फिर्याद विजय ठाकरे यांनी दिली.
फिर्यादीने आपली लहान बहीण व भाची अशी फिर्याद दिली
शिक्षक कॉलनीत राहत होते. त्याचा आरोपी जावई प्रदीप बहीण आणि भाची यांच्यावर छोट्या छोट्या गोष्टींवर तो नाराज व्हायचा. यामुळे दोघांनी आत्महत्या केली आहे.
माहितीनंतर गाडगेनगर पोलिस ठाण्याचे पीआय आसाराम चोरमले
पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मृताजवळ एक सुसाईड नोटही सापडली आहे. सुवर्णा आणि मृणाल यांनी तक्रारदार यांना २४ ऑक्टोबरला फोन केला आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच प्रदीप हा आमच्यावर अत्याचार करत असल्याचे सांगितले होते.
अमरावती येथील शिक्षक कॉलनीत राहणारे प्रदीप वानखडे हे शिक्षक असून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील एका शाळेत कार्यरत आहेत. प्रदीप हे घाटंजीला राहतात तर मुलगी मृणाल व सुवर्णा या दोघी मायलेकी एकत्र राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी मृणालचा पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता म्हणून नोकरीवर लागली होती, तर सुवर्णा शहरातील एका खासगी शाळेत नोकरीवर असल्याची माहिती मिळाली आहे.
शिक्षक संमती कॉलनीपासून जवळच असलेल्या हनुमानमंदिराजवळ मंगळवारी सायंकाळी एकाला सोन्याचे दागिने व काही रोकड पडल्याचे दिसल्याने याबाबत पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली, सदर माहिती विवेकानंद कॉलनीतील आखरे यांना दिली. सदर दागिने पाहिल्यानंतर ते दागिने सुवर्णा वानखडे यांचेअसल्याचे आखरे यांनी ओळखले.डॉ. आखरे हे सुवर्णा वानखडे यांचे भाऊ आहेत. हनुमान मंदिराजवळसुमारे दीडशे ग्रॅम सोन्याचे दागिने व पावणे दोन लाख रुपये रोख होती.
संशय वाढल्यामुळे पोलिसांसह डॉ. आखरे हे वानखडे यांच्याघरी पोहोचले. पोलिसांनी वानखडे यांच्या घराबाहेरून बरेच आवाज दिले मात्र प्रतिसाद येत नव्हता. पोलिसांनी नातेवाइकांच्या उपस्थितीत दरवाजा तोडला आणि घरात प्रवेश केला असता घरातील हॉलमध्ये सुवर्णा आणि मृणाल यांचे मृतदेह दोन पंख्याला लटकलेले दिसून आले.