अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता कक्षाला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली असून सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. ही आग बालकांच्या अतिदक्षता विभागातील इनक्यूबेटर मध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या कक्षात ३५ बालके होती. त्यांना दुसऱ्या कक्षात हलविण्यात आले.
सकाळी नऊ वाजता ही आग लागली, या ठिकाणी 37 बालक होते, आग लागताच तातडीने ही आग नियंत्रणात आणली गेली, 12 बालके इतर रुग्णालयात शिफ्ट केले आहे, कोणत्याही प्रकारचे जीवितहानी झाली नाही, आरोग्य प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला अशी माहिती जिल्हाशल्य चिकित्सक यांनी दिली.
अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटर जळाल्यामुळे किरकोळ आग लागल्याची घटना घडली या दोन बालके किरकोळ जखमी आहेत या रुग्णालयाला भेट देण्यासाठी खासदार अनिल बोंडे स्त्री रुग्णालयात पोहोचले यावेळी त्यांनी नाना पाठवलेंवर निशाणा साधलाय नाना पटोले यांनी आरोग्य प्रशासनाचे कौतुक करायला पाहिजे होतं तातडीने आरोग्य प्रशासनाने हालचाली करून बालकांना सुखरूप दुसऱ्या वार्डात शिफ्ट केले अशी टीका खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.