अमरावती : तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुसली कामनापूर येथे आज सकाळी पतीने झोपेतच कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घुसली कामनापूर येथील आरोपी मधुकर नारायण कतलाम वय 60 वर्ष असून पत्नीचे नाव लता मधुकर नारायण कतलाम वय 52 या असे मृतक महिलेचे नाव होते…
सदर हत्या झालेल्या महिलेच दुसर्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबध होते. ती त्या पुरुषासोबत गेल्या दोन आठवड्यांपासून राहत होती. मयत महिला कामनापूर येथे घरी परतली असता तिने पती आरोपी मधुकर कतलाम याला दुसऱ्यांदा लग्न केल्याचे सांगितले, या कारणावरून दोन्ही पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. काल रात्री ती घरात गाढ झोपली असताना दुसरं लग्न केल्याचा राग मनात धरून तिचा मारेकरी पती मधुकर याने तिची मानेवर, डोक्यावर व चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून तिला ठार केले.
घटना मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास घडल्याने सकाळी घटना उघडीस आली. पोलिसांना माहिती मिळताच एसएचओ रामेश्वर धौंडगे व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी घटनास्थळी भेट घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. पुढील तपास पोलीस ठाण्याचे अधिकारी रामेश्वर धोंडगे यांच्यासह पवन अलोणे, सचिन गायधने, संदेश चव्हाण, गौतम गवळे हे घटनास्थळी तैनात असून मृतदेहाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली. घुसली येथील पोलीस पाटील कु. मीना चंद्रशेखर कडू यांच्या तक्रारीवरून सी. 190/24 कलम 302 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.