अमरावती : दर्यापूर तालुक्यातील येवडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लासूर गावाजवळ एका व्यापाऱ्याची लुटमार करून 23 लाख पळविले असल्याची घटना दि.२६/१२/२३ रोजी घडली, सदर घटनेचा तपास अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम अवघ्या 12 तासात गुन्ह्याचा छडा लावत लुटलेली रक्कमसह तीन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२६/१२/२३ रोजी फिर्यादी दर्शीत हनुमान अग्रवाल रा. मोरबाग हाउस अमरावती यांनी पो.स्टे येवदा रिपोर्ट दिला की, त्यांचे कडे काम करणारे ड्रायव्हर प्रमोद ढोके व सौरभ साहु यांना अकोला येथे त्यांचे स्वताचे मालकीची रेनॉल्ड क्विट क एम एच २७ डी ए ६६९५ या कारने नदीम कादर रा. कोठडी बाजार अकोला यांच्या कडे जावुन पगडी रक्कम २३,०५,४८०/ रु घेवुन आणणेकरीता पाठवीले असता ते दोघे पैशाची वसुली करून कार ने अमरावती करीता दर्यापूर रोडने येत असता लासुर गावाच्या समोर तिन अज्ञात इसमानी त्यांचे ताब्यातील कारला मोपेड गाडीने ठोस मारली व त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच त्यांचे कडील मोबाईल व पैशाची थैली जबरदस्तीने हिसकावून घेवुन पळून गेले वरुन पो स्टे येवदा येथे अप नं ३२२/२३ कलम ३९४,३४१,३४,भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक, विशाल आनंद यांनी सदर गुन्हा उघडकीस आनणे करिता स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण व ठानेदार येवदा यांना आदेशीत केले होते..
स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पथकाने सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गुन्हयातील फिर्यादी कडून प्रथम गुन्हयाची पार्श्वभुमी समजून घेवून गुन्हयातील पिडीत सौरभ मनोज साहु वय २९ वर्ष रा. चेतनदास बगीचा, मसानगंज अमरावती तसेच प्रमोद नामदेवराव ढोके, वय ४२ वर्ष, रा. विलासनगर अमरावती यांना गुन्हयाबाबत सखोल विचारपुस केली असता दोघांचेही कथनामध्ये किरकोळ तफावत दिसुन आल्याने घटनेबाबत संशय निर्माण झाला होता. त्यामुळे सौरभ मनोज साहु याला पुन्हा विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, त्यांना पैशाची गरज असल्याने त्याने त्याचे साथीदार श्रीजीत मुरलीलाल साहू आणि प्रमोद नामदेवराव ढोके यांचे सोबत मिळून कट रचून गुन्हा केल्याची कबूली दिली व सर्व रक्कम श्रीजीत मुरलीलाल साहू याने सोबत नेल्याचे सांगीतले.
वरून श्रीजीत मुरलीलाल साहू रा. पटवाचौक मशानगंज अमरावती यास ताब्यात घेवून त्याचे राहते घरून १) गुन्हयात चोरी केलेले एका लाल काळया रंगाचे बॅग मधील नगदी २३,०५,४८० /- रु २) गुन्हयात वापरलेली पांढ-या रंगाची अॅक्टीवा मोपेड क एम.एच २७ ए.वाय ४८९२ किं. ७०,०००/- रू असा एकुन २३,७५,४८० /- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी व जप्त मुददेमाल पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन येवदा यांचे ताब्यात देण्यात आले. गुन्हयातील तिन्ही आरोपीतांना अटक करण्ययात आली आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी यांचे मार्गदर्शनाखाली, श्री किरण वानखडे, पो.नि स्था.गु.शा अमरावती ग्रा यांचे नेतृत्वात पो.उप.नि संजय शिंदे, अंमलदार त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, शकील चव्हाण, सचीन मिश्रा, सुधिर बावने, सैयद अजमत, निलेश डांगोरे, सागर धापड, रितेश वानखडे यांचे पथकाने केली.