Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | वाद विकाेपाला गेला अन शिक्षिका पत्नीचा खून करुन स्वतःही आत्महत्येचा...

अमरावती | वाद विकाेपाला गेला अन शिक्षिका पत्नीचा खून करुन स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला…

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार शहरातील तहसील कार्यालयाच्या मागील बाजूला भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने ४० वर्षीय शिक्षिका पत्नीचा गळ्यावर चाकूचा वार करुन खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिस व नागरिकांनी धाव घेतली. त्यामुळे तो व्यक्ती बचावला आहे. हा थरकाप उडवणारा घटनाक्रम शुक्रवारी (दि. ५) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

श्रुतिका सतीश काळबांडे (४०) असे मृत महिलेचे नाव आहे तर सतीश उर्फ किशोर काळबांडे (४५, रा.कोल्हा काकडा, ह.मु. महात्मा फुले कॉलनी, चांदूर बाजार) असे गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. काळबांडे हे मागील काही महिन्यांपासून चांदूर बाजार शहरात पत्नी श्रुतिका, मुलगा श्रीजीतसह भाड्याच्या घरात राहत होते. श्रुतिका या चांदूर बाजार येथील एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी जेवण करत असताना सतीश आणि श्रुतिका या दांपत्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. वाद अतिविकाेपाला गेल्यामुळे सतीशने स्वयंपाक घरातील भाजीपाला कापण्याच्या चाकूनेच श्रुतिका यांच्या गळ्यावर वार केला. यामध्येच श्रृतिकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी त्यांचा दहावीत शिकणारा मुलगा श्रीजित हा शाळेत गेला होता.

गुरूवारी (दि. ४) काळबांडे यांचे घरमालक संजय भाविक हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास श्रुतिका यांच्या किंचाळण्याचा आवाज परिसरातील नागरिकांना गेला. त्यामुळे पोलिसांना माहिती देत नागरिकांनी काळबांडे यांचे घर गाठले. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा आत मधून बंद होता. त्याचवेळी पोलिस पोहोचले, त्यानंतर पोलिस व नागरिकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर सतीश काळबांडे फासावर लटकले होते तर श्रुतिका रक्तबंबाळ अवस्थेत त्याच ठिकाणी खाली पडून होत्या.

यावेळी तत्काळ सतीश यांनी घेतलेल्या फासाची दोरी कापून त्यांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले व नंतर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. सतीशने पत्नी श्रुतिकाचा खून का केला, याबाबत शुक्रवारी सायंकाळपर्यंत काही समोर आले नव्हते. दरम्यान, चांदूर बाजार पोलिसांनी श्रृतिकांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून सतीश काळबांडेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: