Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | खुनाच्या गुन्हयातील आरोपी अवघ्या दोन तासांत शिताफीने अटक...चांदुर रेल्वे पोलीसांची...

अमरावती | खुनाच्या गुन्हयातील आरोपी अवघ्या दोन तासांत शिताफीने अटक…चांदुर रेल्वे पोलीसांची कारवाई

पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे हद्दीमध्ये आज दिनांक २० / १२ / २०२२ रोजी सकाळी ०६:०० वाजता पोलीस पाटील राजना यांनी माहिती दिली की, एक अनोळखी इसम हा रक्ताच्या थारोळयामध्ये मरुन पडलेला आहे, अशा माहितीवरुन लागलीच घटनास्थळी जावून घटनास्थळाची पाहणी केली असता एक अनोळखी इसम हा मरुन पडलेला दिसला त्याच्या डोक्यावर गालावर मार असल्याचे प्राथमिकदृष्टया दिसुन आले,

वरुन मृतकाची आजुबाजूला गावांमध्ये ओळख पटविण्यासाठी तपास सुरु केला असता सदर मृतक हा ग्राम सातेफळ पोस्टे तळेगाव येथील अमित नारायण उपाध्याय वय ३८ वर्षे असे असल्याचे समजले, त्याचे नातेवाईक त्याची आई नामे चंदाबाई नारायण उपाध्याय यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या रिपोर्टवरुन गुन्हा क्र. ६३१/२२ कलम ३०२, ३४ भा.द.वि दाखल करण्यात आला.

यामध्ये मृतक हा दिनांक २०/१२/२०२२ रोजी शंकर नेवारे याचे घरी रात्री ०१:०० वाजताचे सुमारास आला त्यामध्ये त्यांचे वाद विवाद झाले सदर वाद विकोपाला जावून – आरोपी नामे १) शंकर मारुती नेवारे वय ४५ वर्षे, २) पियुष शंकर नेवारे वय २० वर्षे व ३) गौरव शंकर नेवारे वय १९ वर्षे सर्व राहणार राजना यांनी त्याला दगड व बांबुच्या काठयांनी मारहाण करुन जिवे मारले आहे.

यातील मृतक अमित उपाध्याय व आरोपी शंकर नेवारे याची पत्नी यांचेमध्ये मागील एक वर्षांपासुन प्रेमसंबंध होते व सदर महिला ही मृतकसोबत एक वर्षापासुन राहत असल्याने त्याचा राग मनात धरुन सदरचा खुन आरोपींनी संगणमताने केलेला आहे.

खुन केल्यानंतर सर्व आरोपी हे पळुन जाण्याच्या तयारीत असतांना त्यांना ग्राम राजना येथुन चांदुर रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुनिल किन, सपोनि अनिल पवार, सपोनि मनोज सुरवाडे, पोहेका संतोष मोरे, पोकॉ अरविंद गिरी, रवि भुताडे, योगेश नेवारे, चांदु गाडे यांनी शिताफीने अटक केली. ही कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री अविनाश बारगळ, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री शशिकांत सातव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चांदुर रेल्वे श्री जितेंद्र जाधव यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: