अमरावती : जिल्ह्यातील तळेगाव पोलीस स्टेशनच्या दशासर हद्दीतील ग्राम सुलतानपुर येथे घरातच सुरु असलेल्या गांजा विक्री व्यवसाय करणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे. सौ वृषाली चंदु मोहीते वय २० वर्ष, व सुमन शेखुलाल मोहीते वय ६० वर्ष यांच्याकडून सुमारे ४.४२० किलो ज्याची अंदाजे १ लाख रुपये किमतीचा गांजा तळेगाव पोलिसांनी जप्त केला आहे. तर चंदु शेखुलाल मोहीते वय २३ वर्ष हा तिसरा आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जिल्हयात मोठया प्रमाणात सण/उत्सव साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने अमरावती ग्रामीण श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, अम.ग्रा. यांनी जास्ती जास्त जिल्हयात अवैध धंदयावर अंकुश लावणे करीता मा. अवैध धंदयावर कारवाई करणे बाबत आदेश निर्गमीत केले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीतील ग्राम सुलतानपुर येथे पो.हे.कॉ. गजेन्द्र ठाकरेब.नं. २७ पो.स्टे. तळेगाव द यांना गोपनिय माहीती मिळाली की, आरोपी नामे चंदु शेखुलाल मोहीते हा त्याचे घरी गांजा विक्री करीता बाळगुन आहे. अशा माहीती वरुन स.पो.नि श्री. रामेश्वर धोंडगे, ठाणेदार पो.स्टे. तळेगाव यांना देवुन सपोनि श्री. रामेश्वर धोंडगे.
यांनी सदरची माहीती वरीष्ठांना देवुन रेड करणे कामी सर्व बाबिंची पुर्तता करुन त्यांचे पोलीस स्टाफसह ग्राम सुलतानपुर येथे नमुद आरोपीचे घरी गेले असता चंदु शेखुलाल मोहीते हा पोलीसांना पाहून पळुन गेला त्याच्या घराची कायदेशिररित्या घरझडती घेतली असता आलमारीच्या मधल्या कप्यात दोन पार्सल टेप पटटीने गुंडाळलेले दिसुन आले.
त्याची पाहणी केली. असता त्यामध्ये हिरवट रंगाचे ओलसर अर्धवट वाळलेले हिरव्या पत्ती, कळी, फुले तथा बिया असलेल्या दिसल्या त्याचा उग्र वास येत असल्याचे दिसुन आले. आरोपी क्र. १ हिला विचारले असता तिने तो गांजा (अंमली पदार्थ) असल्याबाबत सांगितले.
सदर गांजाचे वजन केले. एकुण ४.४२० कि.ग्रॉ. किंमत १०००००/- रु.चा मिळुन आल्याने जप्त करण्यात आला असुन
आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्र. ३ फरार असून शोध घेवून अटक करण्यात येतें.
सदरची कारवाई श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. शशिकांत सातव,
अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. सचिन्द्र शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी, चांदुर रेल्वे श्री. यांचे मार्गदर्शनात श्री. रामेश्वर धोंडगे, ठाणेदार पो.स्टे. तळेगांव यांचे नेतृत्वात पो.उप.नि. कपिल मिश्रा, अंमलदार गजेन्द्र ठाकरे, मनिष आंधळे, विजयसिंग बघेल, विनोद राठोड, संदेश चव्हाण, पवन अलोणे, श्याम गावंडे, अमर काळे, महीला अंमलदार भाग्यश्री काळमेघ, सिमा कोकणे,. भागयश्री उमाळे, कांचन दहाटे यांचे पथकाने केली आहे.