Monday, December 23, 2024
Homeराज्यअमरावती | भंडारा आगाराची एसटी बस नाल्यात पलटली...रिंग रोड रहाटगाव येथील घटना...

अमरावती | भंडारा आगाराची एसटी बस नाल्यात पलटली…रिंग रोड रहाटगाव येथील घटना…

अमरावती : भंडाऱ्याहून अमरावती जिल्ह्यातील परतवाडाकडे जाणाऱ्या भंडारा आगाराची एसटी बस अमरावती रिंग रोड रहाटगाव येथील नाल्यात एसटी बस पलटली असून समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरचे संतुलन बिघडल्याने ही एसटी बस नाल्यात जाऊन आढळली.

सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी मात्र दुचाकीस्वाराला गंभीर मार लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. सोबतच चालकालाही मार लागल्याचे माहिती मिळाली आहे.

या घटनेमध्ये काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती बसमध्ये किमान 30 ते 35 प्रवासी असल्याची माहिती मिळाली असून यात ड्रायव्हरला दुखापत झाला असून तर दुचाकी चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय उपचार सुरू आहे इतर प्रवासी सुखरूप आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: