Sunday, December 22, 2024
Homeराज्यअमरावती । गरम तव्यावर बसणाऱ्या भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार…

अमरावती । गरम तव्यावर बसणाऱ्या भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार…

अमरावती : देशातील बुवाबाजी व अंधश्रद्धा ही कमी व्हायचे नाव घेत नाही. तर अनेकजण या बुवाबाजी ला बळी पडण्याचे प्रकरण नेहमी बाहेर येतात त्यात सर्वाधिक बलात्काराच्या घटना जास्त घडतात असेच एक अमरावती जिल्ह्यातून प्रकरण सध्या समोर आलंय, मागील वर्षी गरम तव्यावर बसून आपला प्रताप दाखवणारे भोंदूबाबा बलात्काराच्या प्रकरणात अडकला असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर असे भोंदू बाबाचे नाव आहे.

मिळालेली माहितीनुसार, तिवसा तालुक्यातील मार्डीच्या आश्रमात गुरुदास बाबाने त्याच्याकडे आलेल्या महिलेचं लैंगिक शोषण केलं. तिचा व्हिडीओ शूट केल्याचा आरोपही पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. पतीचा आजार बरा होण्यासाठी या बाबाने पीडित महिलेला आश्रमात रहायला सांगितले होते. त्यावेळी महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित महिलेने कुऱ्हा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली आहे. पीडित महिला मध्य प्रदेशातील जबलपूर इथली असल्याचं समजते. दरम्यान, गुरुदास बाबा फरार असून त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

याच बाबाचा काही महिन्यापूर्वी गरम ताव्यावर बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. गरम तव्यावर बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुदास बाबाला अंनिसने आव्हान दिले होते. तसंच तिवसा तहसीलदार कार्यालयातून असीही माहिती मिळाली होती की, बाबाने सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून भोंदुगिरी सुरू केलीय. मोलमजुरी करणारा सुनील १५ वर्षांपासून स्वत:ला गुरुदास बाबा म्हणवत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: