Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती हादरले!...अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना...६ आरोपी अटकेत...

अमरावती हादरले!…अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना…६ आरोपी अटकेत…

दिल्ली,बिहार, यूपी राज्याप्रमाणे आता आपल्याही राज्यात गेल्या आठवड्यापासून सामूहिक बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. नुकतेच अमरावतीत नवीन पोलिस आयुक्त रुजू होताच माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

अमरावतीच्या शेंदूरजना घाट पोलीस स्टेशन हद्दीत, १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीतेने नराधमांच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. आणि वडिलांना आपबिती सांगत शेंदूरजना पोलीस स्टेशन गाठून ६ नराधमाविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी ६ आरोपी विरुद्ध बाल लैंगिक कायदा आणि पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविला आहेत. सहाही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.

अल्पवयीन पीडितेने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, तिच्या ओळखीतील एका महिलेने मनीष सदापुरे यांच्या घरी बोलावत असल्याचा निरोप पीडितेला दिला. पीडिता त्या युवकाच्या घरी पोहचल्यावर तेथे आधीच दबा धरून बसलेले चार युवक किचनमधून बाहेर आले. त्यानंतर पाचही आरोपींनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

ADS

निरोप देणाऱ्या महिलेने यावेळी घराचे दार बाहेरून बंद करून ठेवल्याचे देखील तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर कशीबशी सुटका करून ही तरुणी आपल्या घरी पोहचली. मात्र या घटनेच्या आठ दिवसांनी आरोपींपैकी एक असलेला हर्षल गोहत्रे याने या मुलीला पुन्हा महत्त्वाचे बोलायचे आहे असे सांगून भेटायला बोलावले. त्यानंतर आठ दिवस आधी झालेल्या अत्याचाराची घटना सर्वांना सांगण्याची धमकी देऊन पुन्हा अत्याचार केला. यावेळी हर्षलचा मित्र कपिल तिडके देखील सहभागी होता.

दोनवेळा झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने याबद्दल आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर लगेच 17 डिसेंबरला रात्री शेंदूरजना घाट पोलिसांना तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी काल मनीष सदापुरे (25),अमोल बोके (24), पियुष डोके (22), केशव वंजारी (27), हर्षल गोहत्रे, कपिल तिडके (24) आणि एका 47 वर्षीय महिला अशा सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: