अमरावती | विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच जिल्ह्यात शिंदे सेनेच्या जिल्हा कार्यकारणी मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे, सूत्रांच्या माहितीनुसार अमरावती मधील शिंदे सेनेचे अंदाजे 30 कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला मुंबईत गेले असून यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना भेटून अमरावती शहरातील व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याबाबत चर्चा केली. या चर्चेत अमरावती जिल्हाच ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक उत्तर दिल्याने जिल्ह्यात शिंदे सेनेत मोठे बदल पाहायला मिळणार आहे. मात्र मागणी करणारे कोण कोण होते हे समोर आले नसून मात्र फेरबदल नक्कीच होणार असे जवळच्या सूत्रांनी महाव्हाईस न्युजला सांगितले.
मागील आठवड्यात ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे अमरावती जिल्ह्यात शिवसेना पक्षाची मोठी बदनामी झाली होती अश्यातच एका शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले असल्याने शहरातील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले असल्याचे बोलले जात आहे. तर येणाऱ्या दिवसात जिल्ह्यातील व शहरातील कार्यकारणीत बदल होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल…