Sunday, November 17, 2024
HomeBreaking Newsअमरावती |...ती नेहमी त्याचा अपमान करून शिवीगाळ करायची...शेवटी कंटाळून त्याने हे पाऊल...

अमरावती |…ती नेहमी त्याचा अपमान करून शिवीगाळ करायची…शेवटी कंटाळून त्याने हे पाऊल उचलले…

अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दि.१०/०७/२०२४ रोजी. ग्राम एकलविहीर येथील तक्रारदार नामे शेखर शालीकराम धुर्वे, रा. एकलविहीर याने तक्रार दिली की, त्याची आई नामे निला शालीकराम धुर्वे वय ५२ रा. एकलविहीर ता. वरुड जि. अमरावती ही दि.०९/०७/२०२४ चे सायंकाळ दरम्यान बकरी चारण्या करीता घराशेजारील जंगलात गेली असता ती परत आली नाही. कुटुंबातील व गावातील ईतर लोक यांच्या मदतीने तिचा शोध घेतला असता दि.१०/०७/२०२४ रोजी सकाळी ०८/०० वा दरम्यान तिचा मृतदेह जंगलातील नाल्यात पडुन असलेला आढळुन आला. मृतदेहाची पाहणी केली असता अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली असल्याचे प्राथमीक दृष्टया दिसुन येत असल्याने पो.स्टे. वरुड येथे खुनाचा गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला.

सदर घटनेचे गांभीर्य पाहता श्री विशाल आनंद, (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक, अम. ग्रा., श्री. पंकज कुमावत, (भा.पो.से.) अपर पोलीस अधिक्षक, अम. यांनी सदरचा गुन्हा तात्काळ उघड करुन गुन्हयातील आरोपीस अटक करण्याबाबत मार्गदर्शीत केले होते. गुन्हयाचा तपास करण्या करीता पो.स्टे. वरुड व स्थानिक गुन्हे शाखा येथील संयुक्त पथक तयार करण्यात आले होते. तपासा दरम्यान सर्व संभाव्य कारणांची मिमांसा करीत असतांना माहीती मिळाली की, मृतक हीचे तिचा पती नामे शालीकराम धुर्वे, वय ५५ रा. एकलविहीर याचेसोबत पटत नव्हते तसेच घटनेच्या एक दिवस अगोदर दोघांमध्ये पैशाचे कारणावरुन कडाक्याचे वाद सुध्दा झाला होता.

प्राप्त माहीतीच्या आधारे मृतक हीचा पती यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता प्रथम त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली तसेच तो सांगत असलेल्या कथनात येत असलेल्या विसंगतीमुळे पोलीसांनी त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने त्याचे पत्नी सोबत त्याचे पटत नसल्याचे व ती नेहमी त्याचा अपमान करून शिविगाळ करीत होती या कारणांचे रागातुन दि.०९/०७/२४ चे सांयकाळी गुरे चारण्याकरीता जंगलात गेलेल्या पतीस गुरे परत आणण्या करिता मदत करण्यास गेली असता त्याने प्रथम तिचा गळा आवळला त्या दरम्यान ती बेशुध्द झाली नंतर कु-हाडीने तिचा गळा चिरुन हत्या केल्याची कबुली दिली आहे. हत्येनंतर त्याने पत्नी दिसत नसल्याचा बनाव करुन गावातील लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी पतीस अटक करण्यात आली असुनपुढील तपास वरुड पोलीस करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा. विशाल आनंद, (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक, अम. ग्रा., मा. श्री. पंकज कुमावत, (भा.पो.से.) अपर पोलीस अधिक्षक, अम.ग्रा., डॉ. श्री. निलेश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग मोर्शी यांचे मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा., श्री. अवतारसिंग चव्हाण, ठाणेदार, पो.स्टे.वरुड नेतृत्वात पोउपनि. नितीन चुलपार, नितीन इंगोले अंमलदार राजु मडावी, गजेन्द्र ठाकरे, सचीन मिश्रा, बळवंत दाभणे, शकील चव्हाण, रविन्द्र बावणे, भुषण पेटे, पंकज फाटे, राजु चव्हाण, चालक मंगेश मानमोडे यांनी केली.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: