अमरावती : विदर्भाच्या दौर्यावर असलेले माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान अमरावतीत दाखल झाले असून त्याचं शिवसेने कार्यकर्त्यांकरून जंगी स्वत करण्यात आहे. आज संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. मात्र राणा दाम्पत्यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर फाडल्याने आता वाद वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हनुमान चालीसा पठण करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान राणा समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लागलेले पोस्टर फाडले. उद्धव ठाकरे हे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शिवसैनिकांना संबोधित करणार आहे. या ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर राणा समर्थकांनी फाडले.
यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत तणावाचे वातावरण होते. रविवारी सकाळी ११ वाजता शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी पोस्टर लावत असताना कॅम्प परिसरात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांचा निषेध व्यक्त करीत हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा देण्यासंदर्भात लावलेले पोस्टर आढळून आले. यामुळे संतप्त शिवसैनिकांना राणा समर्थकांनी लावलेले सर्व पोस्टर फाडून फेकल्यामुळे राणा समर्थकांनी शिवसैनिकांविरोधात शहरातील राजकमल चौक कॅम्प परिसर, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या ठिकाणी पोस्टर फाडून धिंगाणा घातला.