Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती पोलिसांनी आतंरराज्यीय बोगस सरकारी नोकरीचे रॅकेट केले उघड...विविध जिल्ह्यातील ८ आरोपी...

अमरावती पोलिसांनी आतंरराज्यीय बोगस सरकारी नोकरीचे रॅकेट केले उघड…विविध जिल्ह्यातील ८ आरोपी अटकेत…

अमरावती – सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांना गंडा घालणारी टोळी नुकतीच अमरावती शहरातील गाडगे नगर पोलिसांनी अमरावतीसह अन्य चार ठिकाणहून ८ आरोपी जेरबंद केले असून आरोपींची कसून चौकशी गाडगे नगर पोलीस करीत आहे.

फिर्यादी नामे श्री. विलास एकनाथराव भुरकडे, वय – ५० वर्ष, धंदा- शेती, रा. ठी. मु.पो. हिरूरपुर्णा, तालुका- चांदुरबाजार, जिल्हा अमरावती यांच्या तक्रारीवरून जुन २०२१ ते दिनांक ११/०५/२०२२ रोजीपर्यंत प्रविण नगर, अमरावती येथे राहणारे आरोपीत क्रमांक ०१ ) अनिल तायडे, आरोपीत क्रमांक ०२) त्यांचा मुलगा आशुतोष अनिल तायडे व आरोपीत क्रमांक ०३) मुलगी अविष्का अनिल तायडे, दिल्ली व मुंबई येथील इन्कमटॅक्स, जी.एस.टी. कार्यालयात भेटलेले ०४) अनोळखी इसम, यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात मुलाखत घेणारा ०५) अनोळखी इसम या सर्वानी एकमेकांशी संगनमत करून गुन्हा घडवुन आणण्याच्या उददेशाने अवैध कृती करून त्यांची मुलगी साक्षी हिला शासकीय नोकरी देत असल्याचे आमिष दाखवुन तिच्या नावाचे खोटे व बनावट शासकीय कार्यालयाचे मुद्रा व सहीं असलेले आरोग्य सेवा सचांलनालय, पत्ता:- आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डिमेलो रोड, मुंबई- ४००००१ या कार्यालयाचे दिनांक १७/०३/२०२१ रोजीचे जा. क. रजि. प / अस्था / ५८८/२०२१/९७२ संदर्भाचे पत्र, INCOME TAX DEPARTEMENT,REF : ITD/DT/045/CHD/-1-57 DATE: 26/07/2021 चे रोजीचे पत्र NORTHERN RAILWAY 13 AUG 2021, NO.35754/ADMN/ 667660/MQR/GROUP-C/DLI/20-21, 15614/PROGRAME/DEMAND / GRC / C-111/2020-2021/N-DELHI चे रोजीचे पत्र REF : NO 64495/ADMN/75381/ DLI / 21-22 DATE 03 / 02 / 2022 चे रोजीचे पत्र प्रधान मुख्य आयकर आयुक्त कार्यालयाचे दिनांक २९/०४/२०२२ रोजीचे पत्र देउन त्यांची एकुण १५,००,०००/- रूपयेची आर्थिक फसवणुक केली असल्याची तकार दिल्यावरून गाडगेनगर पोलीस ठाणे येथे दिनांक ०८/११/२०२२ रोजी गु. नो. क्र. १३२३/२०२२, कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२० ( ब ) ३४ भा. द. स. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मा. पोलीस आयुक्त, अमरावती शहर श्री. नवीनचंद्र रेडडी सो., मा. पोलीस उप आयुक्त परिमडंळ – ०१ श्री.सागर पाटील सी., मा. सहायक पोलीस आयुक्त श्रीमती पुनम पाटील सो, गाडगेनगर विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आसाराम चोरमले सो गाडगेनगर पोलीस ठाणे यांनी अमरावती शहरात कोगेना या महामारी नतंर सुशिक्षित तरुणांना सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन आर्थिक फसवणुक करणारी या सक्रीय आतंरराज्यीय टोळीला जेरबंद करण्याचे आदेश सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद साळोखे आणि तपास पथक यांना दिल्यानतंर नमुद गुन्हयाच्या केलेल्या मागील दोन महिन्याच्या तपासात अमरावती, यवतमाळ, मुंबई, सातारा आणि दिल्ली येथुन एकुण ०८ आरोपीत अटक करण्यात आले.

असुन या गुन्हयामध्ये रेल्वे आणि आयकर विभागात नोकरी लावुन देण्याचे आमिष देउन बोगस व बनावट नियुक्ती प्रमाणपत्र, पोस्टिंग लेटर देउन सामान्य नागरिकांची फसवणुक करणारे दिल्ली येथील मुख्य आरोपीत नामे अनिल उदय गौतम उर्फ माथुर याने तो अपघातात मरण पावला असल्याचे या गुन्हयातील साक्षीदारांना सांगुन तो अज्ञातवास झाला होता परंतु मुख्य आरोपीताचा मागील १२ दिवस सलग पाठपुरवठा करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केली व या अटक आरोपीतांकडुन गुन्हयातील मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीताकडुन रोख ७०,०००/- रूपये २२१.४१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण किंमत १२,४०,९६६/- रूपये, ७०६ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने एकुण किंमत ४५,८९०/-रूपये,शोभेचे दागिने किंमत १५,४००/- रूपये, लॅपटॉप किंमत १५,०००/- रूपये, प्रिंटर ५०००/-रूपये अशी एकुण१३,२२,२५६/- रूपयेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्हयातील अटक करण्यात आलेले ०८ आगेपीतापैकी ०७ आगेपीत हे न्यायालयीन कोठडीत असुन ०१ मुख्य आरोपीत हा सध्या पोलीस कोठडीत असुन त्यास मा. न्यायालयात हजर केले असता दिनांक ३०/०१/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत. सदर मुख्य आरोपीताकडे आणखी किती सामान्य नागरिकांना सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसविले आहेत याचा तपास चालू आहे.

मा. पोलीस आयुक्त, अमरावती शहर, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ -०१, मा. सहायक पोलीस आयुक्त, गाडगेनगर विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली महायक पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद साळोखे, पो. उप निरी. राजेंद्र जठाळे, पो.ह. क्र. ८६७ / नंदकुमार इंगळे, पो. ना. क्र. १३४६ / अमोल यादव, पो.शि. क्र. ६६२ / गोरख पिंगळे, पो.शि.क्र. १३८५ /

राहुल टवळालकर, पो.शि.क्र. ८७ / मनीराम बेठेकर, पो.शि. क्र. ६८७ / ओम सावरकर, पो.शि. क्र. ६८२ / सिदधार्थ श्रृगांरपुरे (तांत्रिक मदत सपोनि रविंद्र सहारे, पोलीस अमंलदार पकंज गाडे) या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कौशल्यपूर्ण व तांत्रिक पदधतीने तपास केला आहे. सामान्य नागरिकांनी अशा बोगस सरकारी नोकरीच्या अमिषाला बळी पडु नये तसेच अशी काही घटना आपणास निदर्शनास आल्यास संबंधित विभागप्रमुख किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा असे पोलिसांतर्फे आवाहान करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: