Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayअमरावती | 'त्या' बेपत्ता मुलीबाबत पोलीस आयुक्त म्हणाल्या...

अमरावती | ‘त्या’ बेपत्ता मुलीबाबत पोलीस आयुक्त म्हणाल्या…

अमरावती शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या ‘लव जिहाद’ प्रकरणावर आज अखेर पडदा असून याप्रकरणाबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त यांनी सदर मुलीचा प्राथमिक जबाब पोलिसांनी नोंदविल्याचे म्हटले आहे. काल याच प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि पोलिसात खडाजंगी सुद्धा बघायला मिळाली, त्या 19 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला डांबून ठेवले असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता, मात्र तो आरोप पोलीस आयुक्त आरतीसिंग पूर्णता फेटाळून लावत, खरी माहिती प्रसार माध्यमांना दिली.

पोलीस आयुक्त आरती सिंग म्हणाल्या, “ही मुलगी पुण्यात होती आणि आता ती पुण्यातून ट्रेनने साताऱ्याकडे जात आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. साताऱ्यात ती मुलगी ट्रेनमधून उतरली तेव्हा सातारा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. ती एकटी होती आणि सुखरुप होती, अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली.”

“पोलिसांनी तिचा प्राथमिक जबाब नोंदवला आहे. त्यात मुलीने एवढंच सांगितलं की, ती स्वतः रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. मुलगी अमरावतीत आल्यावर आम्ही तिचा तपशीलवार जबाब नोंदवू,” असंही आरती सिंग यांनी नमूद केलं.

काल खासदार नवनीत राणा यांचा राजापेठ पोलीस ठाण्यात आक्रमकता बघून अनेकांना लव्ह जिहादच प्रकरण पोलिसांनीच घडवून आणला की काय असे दिसत होते, मात्र आज आयुक्तांनी केलेल्या खुलास्यावरून सर्व चित्रच स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: