अमरावती – दुर्वास रोकडे
आंध्र प्रदेशातून शहरात विविध मार्गाने मोठ्या प्रमाणात गांजा येत असल्याचे पोलिसांच्या कारवायांमधून अनेकदा समोर आले आहे दरम्यान यावेळी गांजाची खेप आणणाऱ्या दोघांनी तस्करीसाठी थेट छातीला गांजा बांधून 48 तासाचा प्रवास करून अमरावती गाठोड मात्र तरीही ते पोलिसांच्या हाती लागले गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्याकडून दहा किलो गांजा जप्त केला गांजा तस्करीची ही नवी पद्धत यावेळी समोर आली आहे ही कारवाई गुरुवारी रात्री केली. सै.अजमल सै. मुकद्दर वय ५५ रा. आझादनगर आणि समीर शहा नाजेर शहा २७ रा. लालखडी यांना पोलिसांनी गांजा तस्करी प्रकरणात अटक केले आहे हे दोघे आंध्र प्रदेशातून शहरात गांजा विक्रीसाठी घेऊन आले होते.
या दोघांकडून पोलिसांनी प्रत्येकी 10 किलो गांजा जप्त केला हे दोघे आंध्र प्रदेशातून शहरात गांजा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती त्यामुळे गुन्हे शाखेच्या युनिट एक चे पथक पंचवटी चौकात दबंग धरून बसले होते ते एसटी बस मधून खाली उतरतात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची अंगदर्ती घेतली त्यावेळी दोघांनाही खाली वाकता येत नव्हते नंतर पोलिसांनी तपासणी केली असता दोघांच्याही छातीपासून ते कमरेपर्यंत गांजा बांधलेला दिसून आला त्यांनी गांजावर शर्ट घातला होता तसेच त्यावर मोठा आकाराचा दुपट्टा बांधला होता तस्करीची ही पद्धत पाहून पोलिसी ही चक्रावले पोलिसांनी दोघांनाही अटक करत त्यांच्याविरुद्ध गाडगे नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे दोघेही रोजंदारी पद्धतीने गांजाची खेप घेऊन येणारे असल्याची माहिती समोर आली मात्र त्यांनी कोणालाही गांजा आणला आहे पोलिसांच्या तपासात शुक्रवार पर्यंत समोर आले नव्हते ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकचे पीआय गोरखनाथ जाधव, एपीआय मनीष वाकोडे ,योगेश इंगळे पीएसआय प्रकाश धोपाटे यांच्या पथकाने केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.