संकल्प बहुउद्देशिय संस्थेच उत्कृस्ट नियोजन
अमरावती : शेतकरी व तसेच गोरगरिबांना लग्नाचा खर्च होऊ नये म्हणून यासाठी अमरावती संकल्प बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन कदम यांनी पुढाकार घेत आपल्या वाढदिवशी सर्व व धर्मीय सामुहिक 70 विवाह सोहळ्याचे आयोजन शहरातील जाधव पलेस या ठिकाणी मोठ्या थाटात पार पडला. या विवाह सोहळ्यातील वधू वरास आशीर्वाद देण्याकरिता माजी आमदार डॉ सुनील देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.
लग्न म्हटले की खर्च, खर्च म्हणजे एकतर जमवलेली संपती खर्च करणे किंवा कर्ज काढने व वाढत्या महागाईच्या जमान्यात उदर निर्वाह करणे, शिक्षण करणे अत्यंत कठिण झाले आहे. आणी कर्ज काढल्यावर परत फेड करणे न झाल्यास मुलाचा-मुलीच्या आई वडीलांना आत्महत्या शिवाय पर्याय नाही राहत अश्या प्रसंगी गरीब, शेतकरी, शेतमजूर कामगार अनुसुचित जाती व वि.जे.एन.टी. ओबीसी, व सर्वजातीय, स्वः जातीय, आंतरजातीय सामुहिक विवाहाचे आयोजन आज करण्यात होते. ह्या सामूहिक विवाह मध्ये लग्न करणाऱ्या वधु-वरांना संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे माध्यमातून शासकीय अनुदान मिळवून देण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच विवाह सोहळ्यामध्ये संकल्प बहुउद्देशिय अध्यक्ष समाज सेवक नितीनभाऊ कदम यांच्या वतीने मुलींचा भाऊ म्हणून, वडील म्हणून सर्व मुलींचे स्वतः कन्यादान केले हे विशेष.
लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. त्यासाठी मानवी प्रयत्नही तितकेच गरजेचे असतात. सुयोग्य जोडीदाराच्या निवडीचा क्षण हा अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. अश्यातच संपूर्ण शहरामध्ये बहुचर्चित असणारी संस्था “संकल्प बहुद्देशीय संस्था” ही समाजसेवी नितीनभाऊ कदम यांच्या नेतृत्वात “भव्य सर्वधर्मीय आंतरजातीय सामुहिक विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला…
वधू मुलींना साडी चोळी -बांगळी, मंगळसूत्र, नवरदेव यांना सुध्या आकर्षित भेट वस्तू देण्याची ची व्यवस्था करण्यात आली होती तर डॉ रुपेश खडसे यांच्या तर्फे मोफत ड्रायविंग लायसेन्स देण्यात आले