Sunday, December 22, 2024
Homeराज्यअमरावती | नवनीत राणासह या तिघांना निवडणूक आयोगाकडून नोटीस...

अमरावती | नवनीत राणासह या तिघांना निवडणूक आयोगाकडून नोटीस…

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा राज्यात चांगला गाजला कारण या मतदासंघात राणा दाम्पत्याचे आणि आमदार बच्चू कडू यांच्यात निवडणुक दरम्यान खडाजंगी बघायला मिळाली. त्यामुळे हा मतदार संघ बराच चर्चेत राहिला. मात्र हा मतदासंघ पुन्हा एकदा चर्चेत आला तो निवडणूक आयोगाच्या नोटीस मुळे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवाराना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या उमेदवारांमध्ये नवनीत राणा यांचाही समावेश आहे. निवडणूक खर्चाच्या हिशोबाचा ताळमेळ जुळत नसल्याने आयोगाकडून ही नोटीस देण्यात आली आहे.

खासदार नवनीत राणा, आमदार बळवंत वानखडे आणि दिनेश बुब या तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवल्या आहेत. सँडो रजिस्टर आणि उमेदवाराने दाखवलेल्या खर्चात मोठी तफावत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. नवनीत राणांनी 17 लाख 30 हजार, एवढा कमी खर्च दाखविल्याने सामान्य जनतेचा विश्वास बसणे शक्य नाही. तर बळवंत वानखडे 24 लाख 1 हजार तर दिनेश बूब यांनी 28 लाख 47 हजारांचा खर्च दाखवला आहे. दरम्यान, निवडणुकीत 95 लाखांपर्यंत खर्च करण्याची निवडणूक विभागाची मुभा आहे. या तिघांच्या खर्चा मध्ये सर्वात कमी खर्च नवनीत राणा यांचा आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: