रोहीत सोळंके यांनी बळवंतराव निवडून येण्यासाठी मारोतीला घातले होते साकडे..
मूर्तिजापूर – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदार संघातून निवडून आलेले नवनिर्वाचीत खासदार बळवंतराव वानखडे यांचा मूर्तिजापूरच्या प्रसिद्ध महारुद्र मारोती संस्थान देवरण येथे दर्शन घेऊन कार्यकर्त्याची देवाला साकडं घातल्याची इच्छा पुर्णत्वास नेत सदिच्छा भेट दिली.
गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून आणारा निधड्या छातीचा राजकीय नेता, निधड्या छातीचा धर्मनिरपेक्ष नेता, ग्रामपंचायत सदस्य ते खासदार असा प्रवास करत गल्ली ते दिल्लीच्या तख्तावरील राजकारणातला अष्टपैलू नेता, आपल्या वागण्यातून बोलण्यातून नव्या पर्वाची लढाई घडवून आणणारा शक्तिशाली नेता, रुग्णांसाठी धावून जाणारा, शेतक-यांसाठी झटणारा, बेरोजगारांसाठी एक-न्यांसाठी लढणारा नेता म्हणजे खासदार बळवंतराव वानखडे हे लोकसभा निवडणुकीत निवडून यावे यासाठी मूर्तिजापूरचे पत्रकार तथा काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते रोहित सोळंके यांनी देवरणच्या नवसाला पावणारा प्रसिद्ध अशा महारुद्र मारुती यांना साकडे घातले होते त्यास महारुद्र मारुती यांनी आपला आशीर्वाद देत रोहित सोळंके यांची मनोकामना पूर्ण केल्याबद्दल देवाला कबूल केलेले त्यांची परतफेड खासदार बळवंतराव वानखरे हस्ते अकरा नारळ वाहून करण्यात आली आणि वानखडे यांचा शाल,श्रीफळ व हनुमानजीचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला. व स्वच्छता अभियान टीमच्या वतीने खासदार बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते पक्षांसाठी पानवटा देवरन येथे लावण्यात आला त्यानंतर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंडूभाऊ डाखोरे यांच्या घरी सदिच्छा भेट देत त्यांच्या डी एम बॅटरीज या दुकानाला सुद्धा सदिच्छा भेट दिली.
यावेळी बबनराव डाबेराव माजी सभापती,अशोक दुबे, बंडूभाऊ डाखोरे, अनंत पांडे , पत्रकार मिलींद जामनिक ,नागोराव तायडे, राजूभाऊ डाखोरे, प्रतीक कुऱ्हेकर,सुमित सोनोने,सागर कोरडे, प्रकाश मुळे,राम कोरडे,मो. शहाबुद्धीन , निखिल ठाकरे, श्रीकृष्ण गुल्हाने,देवरन संस्थानचे अध्यक्ष दर्शन उपाध्याय ,मूर्तिजापूर स्वच्छता अभियान चे मार्गदर्शक सत्यनारायण तिवारी, अविनाश बांबल ,ज्ञानेश टाले,रवी गोडंचर,रावसाहेब अभ्यंकर, विनोद देवके, गजानन वर्घट यांच्या सह बहुसंख्य उपस्थीत होते.