Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeराज्यAmravati Loksabha | समोर 500 कोटीचा मालक आहे...त्याच्यासमोर आम्हाला लढायचं आहे...बच्चू कडू

Amravati Loksabha | समोर 500 कोटीचा मालक आहे…त्याच्यासमोर आम्हाला लढायचं आहे…बच्चू कडू

Amravti Loksabha : आज अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार दिनेश बुब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर प्रहार पक्षाकडून अमरावती भव्य रॅली काढण्यात आली. यानंतर सभेचं आयोजन केलं. या सभेत बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती देखील केली. “कार्यकर्ते स्वत:चे पैसे खर्च करुन इथे आले, हीच तर प्रहारची ताकद आहे. पण आता झोपू नका. जपून राहा. आता झोप उडवायचे दिवस आहेत. 20 दिवस… आता नाही तर कधी नाही. आता हार घेतली तर पुन्हा पैसेवाल्याची जीत होणार. पुन्हा नेतेवाल्यांची जीत होणार. सामान्य माणसं धुळीत टाकणार. पुन्हा लोकशाही पैशांच्या समोर झुकून टाकणार”, असं बच्चू कडू म्हणाले.

“तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतो, रोज पाच-सहा गाव फिरले पाहिजेत. खिशातले पाचशे ते हजार रुपये खर्च केल्याशिवाय भाऊ ही निवडणूक जिंकू शकत नाही. समोर 500 कोटीचा मालक आहे, त्याच्यासमोर आम्हाला लढायचं आहे. हे पक्ष त्यांच्या पंगतीत बसलेले आहेत. ती पंगत मला तोडायची आहे. त्यासाठी तुम्ही थोडी हयगय केली, फोन केला आणि बच्चू भाऊ गाडी पाठवू का? सांगा, ही दिलदारी दाखवावी लागेल. अमरावतीकरांसाठी 26 दिवस, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, जात काय असेल ते माहिती नाही. एकच लक्ष्य ठेवलं पाहिजे की, तुमचा आमचा स्वाभिमान”, असं बच्चू कडू कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

‘ही आग आम्ही बुजवणार नाहीत’
“अण्णा भाऊ साठेंनी शाहिरीतून हिंदुस्तान उभा करण्याचं काम केलं. महात्मा जोतिबांनी शेतकऱ्यांच्या आसूड पुस्तक लिहून त्यावेळच्या सरकारवर शेतकऱ्याबाबत घणघणात केला. ही ज्वाला गावागावापर्यंत नेण्याचं काम करावं लागेल. दऱ्याखोऱ्यातला एक-एक आदिवासी बाहेर काढून मतदान टाकल्याशिवाय ही आग आम्ही बुजवणार नाहीत. आम्ही आगीत उडी टाकली आहे. आम्ही हिंमतीने समोर आलो आहोत. आम्हाला उद्या कदाचित जेलची पायरी चढावी लागेल, अशी अवस्था आहे. तरीसुद्धा डर नाही, डरानेवाले को हम डराते हैं”, असं बच्चू कडू म्हणाले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: