Amravati Loksabha : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसचे बळवंत वानखडे विजयी झाले असून त्यांनी विद्यमान खासदार नवनीत राणा यांचा १९ हजाराच्या मतांनी पराभव केला. या मतदार संघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई होती मात्र अतिशय सामान्य माणसाने ही लढाई जिंकल्याने खरा लोकशाहीचा विजय झाल्याचे समाधान सामान्य जनतेला आहे. निकालाच्या दोन दिवस आधी एक्झिट पोलमधून नवनीत राणा ह्या दुसऱ्यांदा खासदार होणार असल्याचे अंदाज वर्तविला होता. त्यानुसार नवनीत राणा यांनी विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी मोठी तयारी केली होती. मात्र निकाल काँग्रेस पक्षाकडून लागल्याने नवनीत राणा यांचा हिरमोड झाला आहे. तर कॉंग्रेसने शहरात ठिकठिकाणी विजयी जल्लोष साजरा केला.
निवडणुकीआधी नवनीत राणा यांनी लोकसभेत एक वक्तव्य केल होत कि, “ये देश मी रहना है तो जय श्रीराम बोलना होगा” अश्या घोषणेमुळे नवनीत राणा यांना टीकेला समोर जावे लागले. मात्र स्वताच निवडून न आल्याने लोकसभेचा रस्ता बंद झाल्याने जनमानसात चर्चेचा विषय आहे. Exit poll निवडून येणाचा अंदाज जाहीर झाला, तेव्हा कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, कितीतरी क्विंटल लाडूंचे ऑर्डर दिली मात्र आता ते गोड लाडू कडू झाले. आता देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला मात्र तोही अंदाज चुकीचा ठरू शकतो. कारण भाजपा पूर्ण बहुमतात आली नसून सरकार स्थापन करण्यासाठी नितेश कुमार यांचा सहारा घ्यावा लागेल. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. तर आता मराठी पंतप्रधान व्हावा अशी मराठी माणसाची इच्छा आहे त्यामुळे नितीन गडकरी नावाच नवीन समीकरण तयार होते का? हे पाहणे औतुस्क्याचे ठरणार आहे.
भाजपला अगोदर 400 + चा नारा दिला मात्र आता 300 जागांची जुळवणी कठीण होत चालली. त्यात महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला जास्त जागा मिळाल्या असल्याने भाजपच्या मोठ्या पदाधिकार्यांना तोंड दाखवायला जागा नाही असे विरोधी पक्षांकडून चिमटे घेणे सुरु आहे. विशेष म्हणजे विदर्भाने नेहमी भाजपच्या बाजूने मतदान केले आहे. मात्र यावेळेस विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मजल मारली असून भाजपला 11 जागेवरच समाधान मानावे लागले.
आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तर सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी सुरु झाली. सुरुवातीच्या 2,3 फेर्यामध्ये बळवंत वानखडे पुढे होते मात्र चौथ्या आणि पाचव्या फेरीत 11172 मतांची लीड घेताच कॉंग्रेस मध्ये शांतता पसरली होती. नवनीत यांचा लीड नवव्या फेरीपर्यंत कमी जास्त होत होता त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना जागा जाणार याची भीती वाटू लागली. अचानक 10 व्या फेरी पासून बळवंत वानखडे यांचा लीड वाढू लागला आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जीवात जीव आला.
अमरावती लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार नवनीत राणा, काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे यांच्यात लढत होती, सुरुवातीला प्रहार संघटनेचे दिनेश बुब जास्त मते घेतील असा अंदाज होता मात्र तो चुकीचा ठरला. आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वादामुळे हा मतदारसंघ विशेष चर्चेत राहिला आहे. आताच आलेल्या माहितीनुसार भाजपकडून रिकाऊंटिंगची मागणी केली आहे. मात्र शेवटी बळवंत वानखडे यांना विजयी घोषित केले.
दरम्यान लोसकभा निवडणुकीतील 543 कलांपैकी 294जागांवर एनडीएला आघाडी असून, 225 जागांवर इंडिया आघाडीला सरशी मिळाल्याचं दिसत आहे. इतर पक्षांना 28 जागांवर आघाडी मिळाली असून नुकतीच ही आकडेवारी समोर आली आहे. दुसरीकडे निवडणूक निकालांची आकडेवारी जाहीर होत असतानाच शेअर बाजारातून सर्वाच मोठी बातमी समोर आली. निकालांचे कल हाती आले त्या क्षणी सेन्सेक्स 3000 अंकांनी कोसळला होता, निफ्टी 900 अंकानीं कोसळला…