Saturday, November 9, 2024
HomeराजकीयAmravati Loksabha | अमरावतीत हुकूमशाहीची ट्रायल…शेवटी आमदार बच्चू कडूना मिळालं दुसर मैदान…

Amravati Loksabha | अमरावतीत हुकूमशाहीची ट्रायल…शेवटी आमदार बच्चू कडूना मिळालं दुसर मैदान…

Amravati Loksabha | कालचा दिवस अमरावतीकरांसाठी मनोरंजनाचा दिवस होता पण तितकाच धोकादायक ही दिवस होता कारण हुकूमशाहीची सुरुवात काल येथून झाली असल्याचे अमरावतीकरांनी उघड्या डोळ्यानी बघितले. बच्चू कडू यांचा संघर्ष रात्री उशीरा पर्यंत सुरू होता सलग पाच ते सहा तासापासून ते कार्यकर्त्यांसह ठाण मांडून होते, यामधे त्यांच्या प्रचाराची सुध्दा ऐसी तैसी झाली. जर आमदार असूनही पोलीस बच्चू कडूला न्याय देत नसेल तर!, सामन्यांची काय अवस्था होणार. आज होणाऱ्या अमित शहाच्या सभेसाठी बच्चू कडू यांनी दुसऱ्या मैदानाची व्यवस्था करावी पण कडू हे आपल्या निर्णयावर ठाम होते मात्र कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी माघार घेत आता दुसऱ्या मैदानावर सभा होणार यासाठी राणा यांना चॅलेंज देत १ लाख लोक प्रहार च्या सभेसाठी जमणार असल्याचे सांगितले. अमरावती पोलीस हे राणा दाम्पत्य समोर कसे झुकतात हे चित्र काल पाहायला मिळाले. मात्र या दोघांच्या वादामध्ये पोलिसांची मोठी पंचायत होत असून बच्चू कडू यांची बाजू खरी असून सुद्धा त्यांना न्याय देवू शकत नसल्याने पोलीस हतबल झाले असावे.

नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सध्या अमरावती मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. भाजपने नवनीत राणा यांना लोकसभेचं तिकीट दिल्यानंतर नवनीत राणा यांचा पावर सातव्या आस्मान वर जाऊन पोहचला आहे, या मतदार संघातील इतर धर्माच्या लोकांना धमकावत मोठ्या अहंकाराने..इस देश रहेणा होगा तो जय श्रीराम बोलना होगा…असे धमकी देत बोलतात. स्वतः मात्र आरक्षणाचा फायदा घेवून उभ्या आहेत. भाजप कार्यकर्ते नवनीत यांच्यावर नाराज असून पक्षासाठी प्रचारा सोबत जात आहे मात्र आतून प्रचार दिनेश बूब किंवा बळवंत वानखडे यांचा करत असल्याचे कानात सांगत आहे.

बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने तिथे उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता सायन्सकोर मैदानावरुन नवनीत राणा आणि बच्चू कडू आमने-सामने आले आहेत. आज या मैदानावर अमित शाह यांची जाहीर सभा होणार आहे. अमरावतीमधील मुख्य भागातील सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून सध्या चांगलाच वाद उफाळून येतोय. 23 आणि 24 एप्रिलसाठी प्रहारने दिनेश बूब यांच्या प्रचारासाठी हे मैदान आरक्षित केले होते. त्यासाठी रीतसर पैसे भरुन पावती घेतल्याचा दावा प्रहारने केला आहे. आज याच मैदानावर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि बच्चू कडू यांची सभा होणार असल्याचे समजते. त्यामुळे याच मैदानाच्या आरक्षणावरून बच्चू कडू-राणा आमने-सामने आलेत…मात्र झालेल्या प्रकरणावरून बच्चू कडू कोर्टात जाणार असल्याचं बोललं मात्र कोर्ट ही त्यांच्याच बाजूने निकाल देण्याची भीती बच्चू कडू यांना आहे. मात्र मैदानावर आज काय घडणार हे पाहणे औ्सुक्याचे ठरणार आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: