Amravati Loksabha: अमरावती मतदारसंघात यावेळेस तिहरी लढत असल्याचे चित्र दिसत असतांना असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा नवी खेळी खेळली आहे. त्यांनी वंचित बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांना सोशल मिडीयावर पाठींबा जाहीर करीत आंबेडकर यांना निवडून आणण्याचे आपल्या समर्थकांना आवाहन केले आहे. त्यामुळे या संघात तिहिरी लढत नसून आता चौरंगी लढत होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
ओवेसी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आनंदराज आंबेडकर यांनी यापूर्वीच लोकसभेसाठी या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी एआयएमआयएमला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिसाद दिला. त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला.
ओवेसी यांनी याविषयी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट लिहिली. ” मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना एआयएमआयएमचा पाठिंबा जाहीर करताना मोठा आनंद होत आहे. ते अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना त्यांना विजयी करण्याचे आवाहन करतो.”, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
अमरावती मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या मतदार संघात एआयएमआयएम एकही उमेदवार नाही, मागील वेळेस मुस्लीम मतदार हे नवनीत राणा यांच्या पाठीशी होते, मात्र नवनीत रांना यांनी हिंदू कट्टरतेचा सूर पकडल्यामुळे मुस्लीम मतदार त्यांना मतदान करणार नसल्याचे उघडपणे बोलत आहे. त्यामुळे ही निवडणूक नवनीत राणा यांना अवघड जाणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
I am pleased to announce AIMIM support to Mr Anandraj Ambedkar, the grandson of Dr Babasaheb Ambedkar who is contesting Lok Sabha elections from Amravati. I advise my party workers to work for his victory.
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 8, 2024