Sunday, November 17, 2024
Homeग्रामीणअमरावती | ती पिस्तुल नव्हे तर...दर्यापुर शहरातील व्हायरल चित्रफित बाबत पोलिसांनी केला...

अमरावती | ती पिस्तुल नव्हे तर…दर्यापुर शहरातील व्हायरल चित्रफित बाबत पोलिसांनी केला खुलासा…

अमरावती : दर्यापूर शहरांमध्ये दोन तरुण युवक मंगळवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास शहरातील आठवडी बाजार परिसरातून हातात पिस्तूल घेऊन फिरत असताना वायरल झालेल्या व्हिडिओ झाला होता. रात्री दरम्यान दोन युवक पैकी एकाने पांढरा टी शर्ट व काळा पॅन्ट तसेच दुस-याने पिवळा टी शर्ट-काळा पॅन्ट व त्यावर काळे जॅकेट घालुन रस्त्याने फिरत असुन त्यांचे हातात बंदुकी सारखे अग्नीशस्त्र असल्याची चित्रफित काही दिवसांपूर्वी सोशल मिडीया वर व्हायरल झाली होती.

सदर चित्रफित ही गंभीर व संवेदनशिल असल्याने सदर बाबीची सत्यता पडताळणी करणे करिता मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामिण यांनी ठाणेदार पो.स्टे. दर्यापुर यांना आदेशित केले होते. वरुन पो.स्टे. दर्यापुर पोलीसांनी सदर चित्रफित चे अवलोकन करुन सदर चित्रफित मध्ये दिसणारे व्यक्तींचा शोध घेतला असता सदर व्यक्ती हया अनुक्रमे १) विशाल भोलानाथ तांडेकर, रा. बनोसा २) सुरज पुरुषोत्तम वाघमारे रा. दर्यापुर हे असल्याचे निष्पन्न झाले.

वरुन त्यांना विचारपुस केली असता सदर इसम हे दिनांक ३०/११/२०२२ रोजी मित्राचावाढदिवस साजरा करुन घरी परत जात असतांनाचा असल्याचे तसेच त्यांच्या हातात असलेले
चित्रफित मध्ये दिसणारे अग्निशस्त्र हे बंदुक नसुन मेणबत्ती पेटविण्याचे लायटर असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दर्यापुर पोलीस कायदेशिर कारवाई करीत आहेत.
अमरावती ग्रामिण पोलीसांतर्फे जिल्हयातील नागरीकांना अश्या समाजात भितीचे वातावरण निर्माण करणा-या चित्रफित किंवा अफवांवर सहजा सहजी विश्वास न ठेवता अश्या काही घटना लक्षात येताच नागरीकांनी स्थानिक पोलीसांशी त्वरीत संर्पक करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: