Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsअमरावती | हॉटेल शेर-ए-पंजाबमध्ये कर्मचाऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या !...

अमरावती | हॉटेल शेर-ए-पंजाबमध्ये कर्मचाऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या !…

अमरावती : शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यासमोरील हॉटेल शेरे पंजाब बार & रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास संतोष त्रंबक सोनसढे या ४७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृतदेह पहिल्या मजल्यावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. हॉटेलमधीलच संतोषने दुपट्ट्याच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे हॉटेलमधीलच काही कर्मचाऱ्यांनी पाहिले. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ दिवसांआधी संतोषच्या वडिलांनी फाशी घेतली सहा महिन्याआधी आईने फाशी घेतली आणि आज संतोषने गळफास घेवून आपले जीवन संपविले. संतोष यांचा मुलगा ओम संतोष सोनसढे यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: