Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsअमरावती | उपोषणस्थळीच उपोषणकर्ता शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या!...

अमरावती | उपोषणस्थळीच उपोषणकर्ता शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या!…

अमरावती : वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिंगोरी या गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्डी या ठिकाणापासून अप्पर वर्धा धरणाच्या बॅक वॉटर पात्रात जुनी सुरवाडी, भुताबर्डी या ठिकाणी अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आंदोलन काही दिवसांपासून सुरु आहे अश्यातच शुक्रवारी रात्री उपोषण मंडपात एका उपोषण कर्त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात राहणारे गोपाल दहीवडे अस गळफास घेवून आत्महत्या करण्याऱ्या आंदोलकांचे नाव आहे आंदोलक अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या अप्पर वर्धा धरणग्रस्तांना कायमस्वरूपी व हक्काची जमीन देण्यात यावी, सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र धारकांना 25 ते 30 लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी ज्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाहीत त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे.

ज्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही अशा संपूर्ण शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावानुसार अनुदान मिळावे या सर्व मागण्याची शासनाकडून पूर्तता ना झाल्यामुळे शासनाच्या व प्रशासनाच्या आडमुठेपणा मुळे 251 दिवसापासून सुरू असलेल्या मोर्शी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरूच आहे त्यांच्या मागण्याची पूर्तता न झाल्यामुळे  गोपाल दहीवडे यांनी आत्महत्या केली असून आपल्या आत्महत्येला शासन प्रशासन जवाबदार असल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे सध्या या ठिकाणी तणावाची परिस्थिती असून हा लढा असाच सुरुच ठेवावा असेही गोपाल यांनी लिहून ठेवले आहे. घटनास्थळावर पोलीस पोहचले असून पुढील तपास सुरु केला आहे

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: