अमरावती पदवीधरच्या मतदारसंघांत सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे डॉ. रणजीत पाटील यांचा पराभव झाला आहे. नागपुरातील शिक्षक मतदारसंघाची हक्काची जागाही भाजपने गमावल्याने आता विदर्भात भाजपचे वर्चस्व संपले की काय? असे सामान्यांना वाटत आहे. कालपासून सुरु असलेल्या मतमोजणीमुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना जीव खालीवर होत होता.
नागपूर विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनंतर अमरावती विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतही सत्ताधारी पक्ष भाजपचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार धीरज लिंगाडे यांना 46330 मते मिळाली. भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव झाला. निवडणुकीत विजयासाठी 47101 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता, मात्र एकाही उमेदवाराला तेवढी मते मिळाली नाहीत.
उमेदवार अनिल अमलकर बाद (२१ उमेदवार बाद) अंतिम मतसंख्या
धीरज लिंगाडे – ४६ हजार ३४४
डॉ. रणजीत पाटील – ४२ हजार ९६२
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी पूर्ण
माविआचे धीरज लिगांडे यांना 46344 मते
भाजपचे रणजीत पाटील यांना 42962मते
3382 मताने महाविकास आघाडी चे धीरज लिंघाडे विजयी
दोन्ही उमेदवारांनी विजयाचा कोटा 47 हजार101 पूर्ण झाला नाही त्यामुळे धीरज लिंघाडे यांना46330 एवढे सर्वाधिक मते मिळाल्याने महाविकास आघाडीचे धीरज लिंघाडे यांना विजयी घोषित करण्यात आले