Monday, December 23, 2024
HomeBreaking NewsAmravati | दर्यापूर येथे कारवर गुंडांचा गोळीबार...तीन जण जखमी...आरोपी पसार...

Amravati | दर्यापूर येथे कारवर गुंडांचा गोळीबार…तीन जण जखमी…आरोपी पसार…

Amravati : जिल्ह्यातील दर्यापूर येथून धक्कादायक घटना समोर येत आहे. अमरावती वरून अंजनगाव कडे जाणाऱ्या कुटुंबाच्या कारचा पाठलाग करून दर्यापूर येथील रफत पेट्रोल पंपाच्या जवळ मागून येणाऱ्या कार मधून आरोपींनी तीन राऊंड फायर केल्या असून यात कार मध्ये बसलेली युवती सह अन्य दोन जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार रोजी सायंकाळी आठ वाजता सुमारास घडली आहे. फायर करणारी कार सुसाट वेगाने फरार झाली आहे. यात जखमींना तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे फायर करणाऱ्या कारचा पाठलाग दर्यापूर पोलिसांनी सुरू केला असून लोकेशन नुसार विविध पोलीस स्टेशनला या संबंधात माहिती देण्यात आली आहे.

अंजनगाव येथील राहणारे कुटुंब अमरावती वरून दर्यापूर मार्गे अंजनगाव येथे जाण्याकरता कार क्रमांक MH 27 DA 8721 या कर ने निघाले असता अमरावती येथील रेवसा फाट्याजवळ त्याची कार पंचर झाल्याचा त्यांना लक्षात आला व त्याचं ठिकाणी आरोपी महेश हळदे राहणार अमरावती हे त्यांचा पाठलाग करत असल्याचे मुलीच्या कुटुंबीयांना लक्षात आले, असे त्यांनी आपल्या बयानत पोलिसांना सांगितले मुलीच्या कुटुंबियांनी पंक्चर दुरुस्त केल्यानंतर आपल्या कारचा महेश हळदे हा चार ते पाच युवकांसोबत पाठलाग करत आहे असा संशय आल्याने कार मधील बसलेले गजानन हुरपडे यांनी 112 नंबर वर पोलिसांना संपर्क साधला, सदर हद्द वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने वलगाव पोलिसांनी त्यांना ताबडतोब संरक्षण देत खोलापूर पोलीस स्टेशन पर्यंत आणून सोडले. यानंतर खोलापूर पोलीस स्टेशनच्या संरक्षणात सदर कुटुंबाची कार बोराळा फाट्यापर्यंत (खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीपर्यंत) आली इथून दर्यापूर पोलीस स्टेशनची हद्द सुरू होते. मात्र दर्यापूर पोलिसांनी पुढील संरक्षण देण्यास उशीर केल्यामुळे पाठलाग करणाऱ्या कार मध्ये बसलेल्या महेश हळदे याचे फावले दर्यापूर जवळ आल्यानंतर दर्यापूर अमरावती रस्त्यावर असलेल्या रफत पेट्रोल पंपाच्या काही अंतरावर सदर कार असताना बीएमडब्ल्यू या कार मध्ये सवार असणाऱ्या गुंडांनी त्यांच्याकडील पिस्तूल मधून ताबडतोड फायर केले यात या वाहनावर तीन राऊंड फायर केले असल्याचे समजले आहे.

सदर कारचा काच फुटून त्या बाजूला बसलेल्या युवतीच्या कानाला गोळी लागली तर मागच्या सीटवर बसलेल्या कुटुंबीय जखमी झाले फायर झाल्यानंतर सदर कार सुसाट वेगाने पळून गेली या फायर मध्ये सौ तेजस्विनी विश्वजीत राणे वय 26, मुलीची आई सौ अनिता रामकृष्ण सोळंके मुलीचे वडील रामकृष्ण सोळंके सहकारी गजानन सुधाकर उर्फडे सर्व राहणार अंजनगाव सुर्जी हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संतोष डाबेराव यांनी त्यांचे उपचार केले असून गंभीर जखमी असलेल्या तेजस्विनी राणे या मुलीला तातडीने अमरावती इथे रेफर करण्यात आली आहे.

डॉक्टर संतोष डाबेराव यांच्या मते सदर फायर हा देशी कट्ट्यातून झाला असावा असा संशय असल्याचा त्यांनी सांगितले. फरार झालेल्या कारचा पाठलाग दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले हे आपल्या सहकारासह करत आहेत. दर्यापूर शहरात अशाप्रकारे गोळीबार होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने घटनास्थळासह उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची गर्दी जमली होती. या घटनेने दर्यापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे .

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: