Saturday, December 21, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | चोरीला गेलेली मोटर सायकल फ्रेजरपुरा पोलिसांनी चोरट्याकडून केली हस्तगत...

अमरावती | चोरीला गेलेली मोटर सायकल फ्रेजरपुरा पोलिसांनी चोरट्याकडून केली हस्तगत…

अमरावती : दिनांक 19/06/2023 रोजी पो.स्टे. फेजरपुरा अमरावती शहर येथे फिर्यादी नामे एड. प्रदीप प्रभाकरराव प्रेमलकर रा. परिहारपुरा वडाळी अमरावती यांनी पो.स्टे.ला हजर येवुन लेखी रिपोर्ट दिला होता की, त्यांचे मालकीची होंडा कंपनीची शाईन मोटर सायकल क्रमांक MH27/ BR-0180 कि. 25,000/- रूपयाची घरासमोर उभी करून ठेवलेली असता दुपार दरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली आहे.

अश्या फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून अप क.452 / 2023 कलम 379 भा.दं.वि. प्रमाणे दाखल करून तपासावर आहे. सदर गुन्हयाचे तपासात दिनांक 16/08/2023 रोजी पो.स्टे.डि.बी.पथकातील कर्मचारी वडाळी परिसरात पेट्रोलिंग करीत असता त्यांना मिळालेल्या माहीती वरून गुन्हयातील आरोपी नामे मनोज भैय्यालाल यादव वय 36 वर्ष रा. देवीनगर वडाळी अमरावती यास ताब्यात घेवुन त्यांचे कडुन व गून्हयात चोरीला गेलेले वाहण क्र. MH27/BR-0180 कि. 25,000/- रू. चे वाहन जप्त करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही मा. नवीनचंद्र रेडडी सा. पोलीस आयुक्त अमरावती शहर, मा. सागर पाटील सा. पोलीस उपायुक्त सा परिमंडळ -01, अमरावती शहर व मा. प्रशांत राजे सा.स.पो.आ. फ्रेजरपुरा विभाग अमरावती शहर यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि. गोरखनाथ जाधव, डि.बी. पथक प्रमुख जमादार योगेश श्रीवास, ना. पो. कॉ. श्रीकांत खडसे, हरीश चौधरी, हरीश बूंदेले पो. कॉ.धनराज ठाकूर यांचे पथकाने केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: