Sunday, September 8, 2024
spot_img
HomeBreaking Newsअमरावती | धारणी येथील जबरी चोरी करणारे गजाआड...स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणची कार्यवाही...

अमरावती | धारणी येथील जबरी चोरी करणारे गजाआड…स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणची कार्यवाही…

अमरावती | धारणी (जामपाणी) येथील जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपीला ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम दोन आरोपींना अटक केली असून या गुन्हातील एक आरोपी पसार झाला आहे. १) सुरेशसिंग गुलाबसिंग सिसोदीया वय ३९ वर्ष व २) रमेश मुन्ना सिसोदीया वय २७ वर्ष दोन्ही रा. बारातांडा (शेतशिवार) असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार,दिनांक ०९/०६/२०२४ रोजी फिर्यादी नामे पवनकुमार मोरे रा. पंधाना (मध्यप्रदेश) हे त्याचे मोटर सायकलने चेंडोते दाबियाखेडा रोड, धारणी येथुन स्वतंत्र मायको फायनान्स लिमी. कंपणीचे नगदी ७४,८०० रुपये घेवुन जात असता. ग्राम जामपाणी गावाजवळ कपडा बांधुन असलेल्या काही अज्ञात इसमांनी फिर्यादी यांना काठी मारुन मोटर सायकलचे खाली पाडुन जखमी केले व त्यांचे कडे असलेले नगदी ७४,८०० रुपये हिसकावुन जंगल मार्गाने पळुन गेले होते.

वरुन पो स्टे धारणी येथे अपराध क. ३६६ / २४ कलम ३९४,३४ भादंवि चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मा.श्री.विशाल आनंद सो.पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांना गुन्हा उघडकिस आणुन आरोपींना अटक करणेबाबतचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने स्थागुशाचे पथक घटनेदिवशी पासुन पो स्टे धारणी येथील अधिकारी अंमलदार याचे सह संयुक्तरित्या आरोपींचा शोध घेणे कामी धारणी हददीत ठान मांडुन बसले असता संयुक्त पथकाने दिनांक १२/०६/२०२४ रोजी मिळालेल्या गोपनिय खबरेवरुन तसेच तांत्रिक पध्दतीने तपास करुन सदर गुन्हा हा सुरेशसिंग गुलाबसिंग सिसोदीया रा. बारातांडा शेतशिवार याने त्याचे साथीदारासह मिळुन केल्याचे निष्पन्न केले.

स्थागुशाचे पथक व स्थानिक पोलिस स्टेशन धारणी येथील पो स्टाफ असे गुन्हयातील आरोपी सुरेशसिंग गुलाबसिंग सिसोदीया वय ३९ वर्ष, रा. बारातांडा (शेतशिवार) याचे बारातांडा येथील शेतात असलेल्या घराजवळ गेले व तेथे सापळा लावला असता सुरेशसिंग सिसोदीया याला पोलिसांची चाहुल लागताच तो जंगलात पळुन जावु लागला त्यास पो स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन त्यास चेंडो ते दाबियाखेडा रोडवरील गुन्हयासंबधाने विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देवुन दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदार रमेश मुन्ना सिसादीया व आणखी एक साथीदार (फरार) यांचेसह मिळुन रमेश सिसोदीया याचे होन्डा शाईन मोटर सायकलने दि.०९/०६/२०२४ रोजी चेंडो ते दाबियाखेडा रोडवर जावुन झाडे झुडपात दबा धरुन तेथुन जाणा-या एका मोटर सायकल चालकास काठीने मारहाण करुन पैसे हिसकावुन नेले होते अशी कबुली दिली. वरुन सदर गुन्हयातील दुसरा आरोपी नामे रमेश मुन्ना सिसोदीया वय २७ वर्ष रा.बारातांडा (शेतशिवार) यास त्याचे राहते घरुन ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी केलेले नगदी ५२,००० रुपये तसेच गुन्हयात वापरलेली होन्डा शाईन मोटर सायकल असा एकुण १२२,००० रुपयाचा माल जप्त करुन दोन्ही आरोपींना पुढील तपासकामी पो स्टे धारणी यांचे ताब्यात देण्यात आले. गुन्हयातील फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

सदरची कारवाई मा.श्री. विशाल आनंद सो. पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रा. मा.पंकज कुमावत सो., अपर पोलिस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अम.ग्रा. यांचे नेतृत्वात, पो.नि.अशोक जाधव, ठाणेदार पो स्टे धारणी, स्थागुशा पथक सहा.पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने चालक श्याम मते व पो स्टे धारणी पोलिस अंमलदार विनोद धर्माळे, प्रविण बोंडे, जगत तेलगोटे, जिवन गोळंबे यांनी केली.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: