Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayअमरावती | आधी तिच्या डोळ्यावर पट्टी बांधायला लावली...अन पुढे जे कृत्य केले...

अमरावती | आधी तिच्या डोळ्यावर पट्टी बांधायला लावली…अन पुढे जे कृत्य केले ते अपेक्षित नव्हत…

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात काल एक खळबळजनक घटना समोर आलीय, ज्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलंय. एका प्रियकराने प्रेयसीला लॉजवर नेले. लॉजवरच्या एका खोलीत तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने डोळ्यावर पट्टी बांधायला लावली. तिने डोळ्यावर पट्टी बांधताच त्याने तिच्या गळ्यावर आणि तोंडावर चाकूने वार केले आणि स्वतावरही चाकूने वार करून जखमी केले. घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.

असे संपूर्ण प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील 19 वर्षीय तरुणी अमरावती शहरात गाडगे नगर परिसरात शिक्षणासाठी राहत होती. तिचे वरुड तालुक्यात येणाऱ्या आमनेर गावातील संकेत दिनेश मांडवकर या युवकासोबत सोशल मीडियावर पाच वर्षांपूर्वी भेट झाली. संकेत हा परतवाडा येथे विद्युत वितरण कंपनी कंत्राटी तत्वावर काम करतो. 19 मार्च रोजी त्याचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी दोघांचीही भेट होऊ शकली नाही यामुळे त्याने तिला आज परतवाड्याला भेटीसाठी बोलावले होते. संकेतने तिच्यासाठी खास अंगठी भेट देण्यासाठी खरेदी केली होती तर तिने देखील त्याच्यासाठी भेटवस्तू आणली होती.

परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात असणाऱ्या टेकाळे कॉम्प्लेक्स येथील एका लॉज मधील खोलीत संकेतने तिला नेले होते. यावेळी तिच्या मोबाईल फोनवर दुसऱ्या युवकाचे सतत मेसेज येत होते. ती आपल्यासह आणखी दुसऱ्या मुलासोबत देखील असल्याचा संशय संकेतला येतात तो प्रचंड संतापला. त्याने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधायला लावली आणि त्यानंतर संकेतने अचानक चाकूने तिच्या गळ्यावर आणि गालावर वार केले. यानंतर त्याने स्वतःला देखील चाकू मारून जखमी करून घेतले.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

दरम्यान या गंभीर प्रकारानंतर त्या युवतीचा ओरडण्याचा आवाज येताच लॉज मालकाने तिला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळतात परतवाडा पोलिसांनी जखमी अवस्थेत असणाऱ्या संकेत मांडवकर याला ताब्यात घेऊन युवतीने दिलेल्या बयानावरून त्याच्याविरुद्ध कलम 307 309 अन्वये गुन्हा दाखल केला. त्या युतीचे दुसऱ्यासोबत अफेअर असल्याचा संशय आल्याने संकेत ने तिच्यावर चाकूने वार केला असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली असून या प्रकरणाचा आम्ही सखोल तपास करीत असल्याची माहिती परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी दिली.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: